काय नाही दिले हो आपल्यास समुद्राने,
ओतून दिले आपले अंतरंग आपल्यासाठी त्याने,
लाखमोलाचे धन त्याच्यात सामावले,
खरं मोल त्याचे कुणी ना ओळखले,
कित्ती विशाल आहे समुद्राचे मन,
लाखो जीवाचा पोशिंदा तोच आहे पण,
समुद्रकिनारी जावे फेरफटका माराया,
हितगुज करून यावं वाटत,मन रमवाया,
धरित्री शी सलगी करावी असे त्यास वाटते,
पण मर्यादेत बद्ध तो, त्यास हे कधी न साधते,
असावं समुद्रापरी अथांग अन खोल,
सामावून घ्यावे सर्व काही, करावं जीवन अनमोल!
अश्विनी थत्ते.....