Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Ozone Day 2021 : जागतिक ओझोन दिन साजरा करण्याचे कारण आणि त्याचे महत्त्व

World Ozone Day 2021 : जागतिक ओझोन दिन साजरा करण्याचे कारण आणि त्याचे महत्त्व
नवी दिल्ली , गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (09:31 IST)
ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केलाजातो. संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. पृथ्वीच्या संरक्षणासाठी ओझोन खूप महत्त्वाचे आहे. ओझोन हा वायूचा पातळ थर आहे.  
 
ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन प्रथम 16 सप्टेंबर 1995 रोजी साजरा केला गेला. दरवर्षी या दिवसाला एक थीम दिली जाते. त्या थीम अंतर्गत हा विशेष दिवस साजरा केला जातो.गेल्या वर्षी म्हणजेच 2020 ची थीम “Ozone for life: 35 years of ozone layer protection” होती.
 
आंतरराष्ट्रीय ओझोन स्तर संरक्षण दिवसाचे महत्त्व ..
ओझोनला पृथ्वीचे संरक्षण छत्र म्हणतात, जे आपल्या पृथ्वीचे रक्षण करते. लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक करण्यासाठी आणि पर्यावरणाचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो. ओझोन हा पृथ्वीसाठी एक प्रकारचा संरक्षक ढाल आहे. ओझोन थर समजून घेऊन तसेच ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस जगभर साजरा केला जातो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम