Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World Wide Web Day वर्ल्ड वाईड वेब WWW चा इतिहास आणि इतर फॅक्ट्स

World Wide Web Day
, शनिवार, 29 जुलै 2023 (15:16 IST)
कोणी कल्पना तरी केली असेल का की माहिती आणि संपर्क फक्त एक बोटच्या स्पर्शाइतकं लांब असणार? 800  A.D. मध्ये चीन येथे तयार होऊन झालेली जगातली पहिली पुस्तक 'डायमंड सूत्र', जी माहिती आणि संपर्का याचं पहिलं पाऊल होती, तिथून ह्या इंटरनेटवर असण्यार्‍या माहितीचे अपार भंडारपर्यंत आधुनिक जगात खूप प्रगती झाली आहे.
   
पहिले भाषाचा विस्तार, नंतर कागद, पत्री, समाचार पत्र त्यानंतर टेलीफोन, रेडिओ, पेजर, टीव्ही, मोबाइल, इंटरनेट आणि ह्या सगळ्यानंतर आलं 'वेब'. संपूर्ण जगाची माहिती आपल्यात समावून घेणारं. ही माहिती जी तुम्ही वाचत आहात ही देखील वर्ल्ड वाइड वेब या माध्यमातून वाचत किंवा बघत आहात.
 
सरळ भाषेत सांगायचं तर तर वर्ल्ड वाईड वेब म्हणजे इंटरनेटच्या मदतीने मोबाईल किंवा कंप्युटरावर हुगडलेली कोणती वेबसाईट किंवा पेज ज्याच्यात कोणत्याही विषय संबंधित माहिती आहे.
 
वर्ल्ड वाइड वेब डे दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा दिवस वेबच्या प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक युगापर्यंतच्या जलद उत्क्रांतीसाठी समर्पित आहे. इंटरनेटचे सर्वोत्तम मूर्त स्वरूप, वर्ल्ड वाइड वेब आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याचे समर्थन आणि प्रचार करण्यासाठी विशेष दिवस सुरू करण्यात आला. हा दिवस वेब द्वारा लोकांचे समृद्ध झालेले जीवन, जनसंचार आणि शिक्षणाच्या विस्तारला साजर करण्याचा आहे.
 
वर्ल्ड वाइड वेब इंग्लिश संगणक शास्त्रज्ञ टिम बर्नर्स-ली यांनी 1989 मध्ये बनवलं होतं, ते स्वित्झर्लंडमधील युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (CERN) साठी काम करत होते. बर्नर्स-ली यांनी संस्थेमध्ये काम करताना  HTTP, HTML, वर्ल्ड वाइड वेब ब्राउझर, सर्व्हर आणि पहिली वेबसाइट विकसित केली.
 
आज आपल्याला कोणत्याही विषयांबद्दल जाणायचं असलं किंवा कोणाशी सम्पर्क साधायचा असला तर आपला पहिला विकल्प म्हणजे वेब आहे. आता हे आर्टिकल देखील आपण वेब वर वाचत आहात. अनेकदा लोकं वेब किंवा इंटरनेट ह्यांना एकच समजतात. वेब, इंटरनेट वरील असलेल्या इतर साधनांपैकी एक आहे. आपण ह्याचे इतके अधीन झाले आहोत की एकादृष्टीचे आपण 'वेबदुनिया' मधेच राहतो हे देखील खरंच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेपी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा संघ जाहीर केला, भाजप संघटनेत मोठे फेरबदल