Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्राचीन भारताचे योग गुरु ज्यांनी जगाला योग शिकवले

प्राचीन भारताचे योग गुरु ज्यांनी जगाला योग शिकवले
, मंगळवार, 9 जानेवारी 2024 (11:06 IST)
जगातील पहिल्या ग्रंथ ऋग्वेदात बऱ्याच स्थानांचा यौगिक क्रियांचा उल्लेख आहे.योगाभ्यासाचे प्रामाणिक चित्रण ई. पू. 3000 सिंधुघाटी सभ्यताच्या वेळी नाणे आणि मुर्त्यांमध्ये आढळते .योग चा प्रमाणिक ग्रंथ 'योगसूत्र' ई. पू.200 योग वर लिहलेला पहिला व्यवस्थित ग्रंथ आहे. चला जाणून घेऊ या भारताच्या प्राचीन योग गुरुं बद्दल ज्यांनी योग निर्माण केले. 
 
1. भगवान शंकर-
देवांचे देव महादेव यांना योगाचे प्रथम गुरु मानले जाते. त्यांनी ही शिक्षा त्यांच्या सात शिष्याना दिली होती. जे सप्तर्षि आहे तेच हे सात ऋषी आहे ज्यांना सप्तऋषि म्हणतात.
त्या नंतर प्रत्येक युगात वेगवेगळे सप्तऋषि झाले. प्रथम सप्तऋषि होते बृहस्पति , विशालाक्ष ( शिव ) शुक्र , सहस्राक्ष , महेंद्र , प्रचेतस मनु , भारद्धाज आणि गौरशिरस मुनि हे पण ऋषी होते. काही विद्धान वशिष्ट ऋषि आणि ऋषि अगस्ती यांना महान शिष्य मानत असे. 

2. ऋषि वशिष्ठ - 
ऋषी वशिष्ठ यांचाही अनेक वेळा उल्लेख केला गेला आहे,परंतु आम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहोत जे सात ऋषींपैकी एक आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. ऋषि वशिष्ठ यांची पत्नी अरुंधति होती. ऋग्वेदात ऋषि वशिष्ठ हे मित्रवरूण आणि उर्वशी यांचे पुत्र आहे असा उल्लेख आहे .
त्यांच्या जवळ कामधेनु गाय आणि तीची बछडी नंदिनी होती. ऋषि वाल्मीक यांनी त्यांच्या नावावर एक ग्रंथ लिहला होता ज्याला  योग वशिष्ठ असे नाव दिले आहे. महाभारता नंतर सगळ्या मोठ्या ग्रंथांपैकी सगळ्यात मोठा महत्वाचा योग ग्रंथ आहे. यात 32 हजार श्लोक आहे. तसेच विषयाला समजून घेण्यासाठी अनेक लघुकथा आणि उपाख्यानांचा समावेश  केला आहे. 
 
3 भगवान श्री कृष्ण-
म्हणतात. ते योगाचे सर्वात मोठे गुरू होते. भगवान श्रीकृष्णाने फक्त गीतेत योगाची चर्चा केली आहे. योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी उज्जैन येथील महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमात राहून वेद आणि योगाचे शिक्षण व दीक्षा घेतली होती. ते योगामध्ये निपुण होते.तथा योग द्वारा जी पण सिद्धि प्राप्त होते  ती त्यांना आपोआपच प्राप्त होती. सिद्धींच्या पलीकडे अजुन एक जग आहे , त्याची चर्चा ते गीतेत करतात. गीता हे मानते की चमत्कार धर्म नाही. स्थितप्रज्ञ होणे हा धर्म आहे. श्रीकृष्ण यांच्या काळात वेदव्यास आणि पराशर ऋषि यांचे नाव योग शिक्षक यांमध्ये घेतले जाते. यापूर्वी श्रीराम यांच्या काळात अष्टावक्र ऋषी होते ज्यांना माहान योगी मानले जायचे. 
 
4 महावीर स्वामी- 
श्री कृष्ण यांच्या नंतर जर कोणी महायोगी झाले असतील तर ते आहेत महावीर स्वामी. त्यांनी योगाचे नियम तपशीलवार देऊन पंच महाव्रतंचा प्रचार केला. त्यांनीच योगाच्या ज्ञानाला नवे रूप दिले. वर्धमान महावीरांनी साडे बारा वर्षे मूक तपश्चर्या केली आणि विविध प्रकारचे कष्ट भोगले. शेवटीत्यांना ज्ञान प्राप्त झाले. तपस्वी होणं हा योगाचा भाग आहे महावीर स्वामी हे पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या परंपरेतील शेवटचे तीर्थंकर होते. त्याच्या आधी अनेक महान योगी होते, त्यापैकी पहिले ऋषभनाथ होते, ज्यांना आदिनाथ म्हणतात.
 
5 गौतम बुद्ध- 
गौतम बुद्ध यांना पुष्कळ लोक श्री हरी विष्णु यांचा तर काही लोक भगवान शिव यांचा अवतार मानतात. त्यांच्या लहानपणीचे नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थ यांनी गुरू विश्वामित्र यांच्या कडून वेकेवळ वेद आणि उपनिषदांचाच अभ्यास केला नाही, तर त्यांनी  राज्यशास्त्र आणि युद्धशास्त्रही शिकले. कुस्ती, घोडदौड, धनुर्विद्या, रथ चालवणे यात त्यांची बरोबरी कोणी करू शकले नाही.घर सोडल्यानंतर त्यांनी अलारा, कलाम, उदका रामपुत्त इत्यादी अनेक ऋषींकडून योग, ध्यान आणि तपश्चर्या शिकली. यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक नवीन मार्ग तयार केला आणि सत्याच्या शोधात निघाले. ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी स्वतःचे तत्वज्ञान आणि धर्म निर्माण केला. त्यांनी योगाच्या आधारे अष्टांगिक मार्ग शिकवला. बुद्धांनी आपली शिकवण पाली भाषेत दिली, जी त्रिपिटकांमध्ये संकलित आहे.
 
6. महर्षि पतंजलि - 
महर्षि पतंजलि हे पाहिले योगी होते ज्यांनी योगाचे उत्तम वर्गीकरण केले आणि ते अतिशय संक्षिप्तपणे स्पष्ट केले.. त्यांनी योगावर खुप पुस्तके लिहलीत ज्यात 'योगसूत्र'हा सर्वाधिक प्रचलित आहे. योगसूत्राचे रचनाकार पतंजलि काशीमध्ये ई. पू. दुसऱ्या शतकात चर्चा मध्ये होते. यांचा जन्म गोनार्द्य गोनिया मध्ये झाला होता. पण सांगतात की हे काशी मध्ये नागकूप मध्ये स्थायिक झाले होते. हे पण म्हंटले जाते की ते व्याकरणाकार पाणिनी यांचे शिष्य होते. भारतीय दर्शन साहित्यात पतंजलीचे प्रमुख तीन ग्रंथ आहे -योगसूत्र , अष्टाध्यायीवरील  भाष्य आणि आयुर्वेदावरील ग्रंथ.
 
7. आदि शंकराचार्य- 
शंकराचार्य यांनी हिन्दू धर्माचे संघटन करण्याचा खुप प्रयत्न केला. त्यांनी हिंदूंच्या सर्व जातींना एकत्रित करून 'दसनामी पंथ बनवले.आणि साधू समाजाची जुनी परंपरा पुनरुज्जीवित करून चार धामची चार पीठांची स्थापना केली, ज्यावर चार शंकराचार्यांची परंपरा सुरू झाली. शंकराचार्य यांचा जन्म केरळ च्या मालाबार क्षेत्र मध्ये कालड़ी नावाच्या गावात नम्बूदरी ब्राह्मण यांच्या घरी झाला होता. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांना निर्वाण मिळाले आणि ते ब्रह्मलोकात गेले.त्यांचे सर्व शिष्य योग साधना करायचे आणि सर्व आदि योग गुरू भगवान शंकरांचे अनुयायी होते. 
 
8. गुरु गोरखनाथ - 
सिद्धांच्या भोगाभिमुख योगसाधनेची प्रतिक्रिया म्हणून नाथपंथींचा हठयोग अभ्यास प्राचीन काळी सुरू झाला. मत्स्येंद्रनाथ (मच्छंदरनाथ) आणि गोरखनाथ (गोरक्षनाथ) हे या पंथाचे संस्थापक मानले जातात या पंथाच्या साधकांना योगी,अवधूत, सिद्ध,औघड़ असे संबोधित करतात. असे म्हंटले जाते की, सिद्धमत आणि नाथमत एकच आहे. 
लिखाणात आणि ध्यानात योगाच्या अंगांना म्हणजेच क्रिया-योगाला अधिक महत्त्व दिले आहे. त्याच्यातून त्यांनी हठयोगचा उद्देश्य दिला. गोरखनाथ शरीर आणि मनासोबत वेगवेगळे प्रयोग करायचे.आख्यायिकेनुसार त्यांनी खुप कठिन आसनांचा अविष्कार केला होता. त्यांच्या अजब आसनांना बघून लोक आश्चर्य करायचे. पुढे खुप म्हणी प्रचलित झाल्या एखाद्याने काही चुकीचे काम केले  तर म्हंटले जाते की 'हा काय गोरख धंदा 
लावला आहे'. गोरखनाथ यांच्या हठयोग या परंपरेला पुढे नेणारे प्रमुख चौरंगीनाथ , गोपीनाथ , चुणकरनाथ ,भर्तृहरि ,जालन्ध्रीपाव इत्यादी आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांची माहिती