सोशल मीडियावर आपण काही सवयींचे बळी गेला आहात का? ही सवय फेसबुक पोस्टावर मिळणार्या लाइक्सशी जुळलेली आहे. आपण एखादी पोस्ट केल्यावर वारंवार त्यावर येत असलेले लाइक्स चेक करता का? वाढत असलेले लाइक्स बघून खूश होता किंवा सतत आपली दृष्टी नोटिफिकेशनवरच असती का?
हे चेक करताना मनात हेही येतं की फलां मित्राने तर लाइक केलंच नाही, त्याच्या पोस्ट तर मी लाइक केल्या आहेत. किंवा लाइक्स मोजत बसता? असे सर्व लक्षण असल्यास जाणून घ्या आपल्यात काही कमी आहे.
संशोधकांप्रमाणे आपल्या जीवनात एखाद्या खास उद्देशाची कमी आहे. एका ताज्या शोधाप्रमाणे, ज्या लोकांच्या जीवनात काही विशेष लक्ष्य प्राप्त करण्याची ललक असते ते स्वत:चे आकलन फेसबुकवर येणार्या लाइक्सने करत नसतात.
खरोखरच्या जीवनात एखादे उद्देश्य असणे, व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये लोकप्रिय होण्याच्या इच्छेपासून बचाव करतं. जीवनात फोकस्ड असल्यास लाइक्सचे संख्येच्या आपल्या प्रभाव पडत नसतो.
संशोधकांप्रमाणे ऑनलाईन कौतुक मिळवणे उत्तम आहे पण त्याला आधार मानून स्वत:चे आकलन करणे उचित नाही. जीवनात लक्ष्य असलेले लोकं लाइक्स बघून खूश होतात परंतू त्या आधारावर स्वत:च्या बाबतीत मत निर्माण होऊ देत नाही कारण ते आपल्या भविष्याप्रती फोकस्ड असतात आणि आपलं उद्देश्य प्रत्यक्षतात उतरविण्यासाठी प्रयत्नशील असतात.