Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक लाखाची दुर्मीळ नोट

एक लाखाची दुर्मीळ नोट
नेताजी सुभाषचंद्र बोस व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमा असलेल्या दुर्लभ नोटा नुकत्याच उजेडात आल्या आहेत. सुभाषचंद्रांची प्रतिमा असलेली नोट चक्क 1 लाख रूपये मूल्याची आहे. या नोटा आझाद हिंद फौजेच्या काळातल्या असून त्या वेळच्या सर्व नोटांवर आझाद हिंद बँक, बँक ऑफ इंडिपेन्डन्सी असा मजकूर आहे. 1944 साली या नोटा जारी केल्या गेल्या होत्या व त्याचा पाया नेताजींनी घातला होता.
 
अर्थात नेताजींशी संबंधित अशी ही पहिलीच नोट नाही. यापूर्वीही 1 हजार रूपये मूल्याची तसेच 100 रुपये मूल्याची नेताजींची प्रतिमा असलेली नोट मिळाली आहे. या नोटा इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. मात्र 1 लाख रूपये मूल्याची नोट प्रथमच सापडली आहे. माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष महेश डांवर यांच्या संग्रहात या दोन दुर्मीळ नोटा सापडल्या आहेत. पैकी एक 1 लाख मूल्याची तर दुसरी 1 हजार रूपये मूल्याची आहे. डांवर यांच्या मते ङ्खार पूर्वीपासून या नोटा त्यांच्या वाडवडिलांनी संग्रही ठेवल्या आहेत. पैकी 1 लाख रूपयाची नोट ङ्खारच जीर्ण असून काही ठिकाणी तिचे तुकडे पडलेले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिओ: बॅडमिंटनपटू सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत