Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या महिलांच्या दीर्घायुचे रहस्य

जाणून घ्या महिलांच्या दीर्घायुचे रहस्य
महिलांच्या दीर्घायुचे रहस्य उलगडण्यात संशोधकांना यश आले असून त्याची कारणेदेखील स्पष्ट झाली आहेत. मधमाशांवर केलेल्या संशोधनातून संशोधकांच्या हाती महत्त्वाचे निष्कर्ष लागले आहेत. मायटोकाँड्रियामध्ये आढळणारे डीएनए आणि त्यात काळानुरून होणार्‍या बदलांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांना महिलांच्या दीर्घायूचे गुपित समजले. 'करंट बायोलॉजी' या विज्ञान नियतकालिकात हे संशोधन सविस्तार प्रसिद्ध करण्यात आले आहे. मोनॅश विद्यापीठातील संशोधकांचे हे संशोधन जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे. 
मानवी शरीरातील ऊतींना ऊर्जेचा पुरवठा करण्यात मायटोकाँड्रिया हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. विशेष म्हणजे हा घटक केवळ आईकडूनच मुलाला मिळतो. मायटोकाँड्रियाचा महिलांवर अनुकूल तर पुरुषांवर प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतो. यासाठी संशोधकांनी मधमाशांच्या शरीरात कशारितीने बदल होतो, याचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला. मयटोकाँड्रिया हा घटक प्रत्येक सजीवात आढळतो, पण मादीच्या शरीरात मात्र तो विशेष अनुकूल बदल घडवून आणत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच घटक पुरुषांचे आयुर्मान कमी करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 
 
दरम्यान, हा घटक पुरुष आणि स्त्री यांच्यात का भेदभाव करतो हे मात्र संशोधकांना स्पष्ट करता आलेले नाही. विशेष म्हणजे बहुसंख्य संशोधकांनीच याला आक्षेप घेतला आहे. स्त्री आणि पुरुषांत होणार्‍या बदलास मायटोकाँड्रिया नाही तर हार्मोन्स कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हिडिओ काढण्यासाठी गंगेत उडी मारली अन् बुडाला