Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशातील सर्वात मोठी धरणे

देशातील सर्वात मोठी धरणे

वेबदुनिया

नद्यांवर बांधलेली धरणे ही आधुनिक भारताची मंदिरे आहेत, असे उद्गार देशाचे पहिले पंतप्रधान प. जवाहरलाला नेहरू यांनी काढले होते. धरणांमुळे शेतीला पाणी, पेयजल, विद्युतनिर्मिती यांच्यासारखे अनेक लाभ मिळतात. देशातील दहा मोठ्या धरणंची ही माहिती.... 
पुढील पानावर पहा टिहरी धरण....

टिहरी

webdunia

PR

उत्तराखंडमध्ये टिहरीजवळ भागीरथी नदीवर हे धरण आहे. त्याची उंची 260 मीटर व लांबी 575 मीटर आहे. क्रेस्टची रुंदी वीस मीटर तर बेसची रुंदी 1128 मीटर आहे.

पुढे पहा भाक्रा धरण


भाक्र

webdunia
PR
पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर सतलज नदीवर हे धरण आहे. भाक्रा गावाजवळील या धरणाची उंची 225.55 मीटर आणि लांबी 518.25 मीटर आहे. याच धरणातून चंदिगढ, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीला पाणीपुरवठा होतो. याचे जलाशय 90 किलोमीटर लांबीचे आहे.

पुढे पहा हिराकुंड धरण


हिराकुं

webdunia

PR

ओडिशात संबलपूर परिसरात महानदीवर हे धरण आहे. पंधरा किलोमीटरच्या परिसरातील हे धरण 1957मध्ये बांधले होते. त्याची लांबी 26 किलोमीटर आहे. स्वतंत्र भारतातील हा पहिला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प होता.

पुढेपहा नागार्जुन सागर धरण


नागार्जुन सागर

webdunia
PR
आंध्र प्रदेशात 1955 ते 67 या काळात हे धरण बांधण्यात आले. स्थापत्यशास्त्राचा हा अजोड नमुना आहे. त्याची लांबी 490 फूट असून 1.6 किलोमीटर लांबीचे 26 दरवाजे आहेत. या धरणात 11,472 दशलक्ष घनमीटरपर्यंत पाणी साठवता येऊ शकते.

पढे पहा सरदार सरोवर धरण


सरदार सरोव

webdunia
PR
गुजरातमध्ये नर्मदा नदीवर हे धरण आहे. 1979 मध्ये हा प्रकल्प सुरु झाला होता. 1980 पासून या धरणाला विरोध सुरू आहे. आकराने मोठे असण्याबरोबरच हे धरण देशातील सर्वात वादग्रस्त धरणही आहे.

पुढे पहा इंदिरा सागर धरण


इंदिरा सागर

webdunia

PR

मध्यप्रदेशात खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीवर हे धरण आहे. त्याची उंची 92 मीटर असून लांबी 653 मीटर आहे. या धरणातून एक हजार मेगावॉट वीज उत्पन्न केली जाते.

पुढे पहा तुंगभद्रा धरण


तुंगभद्र

webdunia

PR

कर्नाटकात होस्पेट शहराजवळ तुंगभद्रा नदीवर हे धरण आहे. या धरणाची क्षमता 101 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची आहे. हे धरण 49.5 मीटर उंच आहे.

पुढे पहा भवानी सागर धरण


भवानीसाग

webdunia

PR

तामिळनाडूत इरोड जिल्ह्यात भवानी नदीवर हे धरण आहे. आजबाजूच्या सर्व परिसराला याच धरणातून पाणीपुरवठा होतो.

पुढे पहा कोयना धरण


कोयना

webdunia

PR

कोयना धरणात देशातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे. हा एक कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट असून त्यात चार धरणांचे पाणी वापरले जाते. या प्रकल्पातून एकूण 1920 मेगावॉट वीज उत्पन्न केली जाते.

पढे पहा अड्डकी धरण


अड्डकी

webdunia

PR

केरळमध्ये कुरावन माला (839 मीटर) आणि कुराथी माला (925 मीटर) या दोन डोंगरांच्या मध्ये हे धरण आहे. केरळच्या वीज महामंडळाने त्याची निर्मिती केली आहे. पेरियार नदीवरील या धरणात 780 मेगावॉटचा जलविद्युतप्रकल्प आहे. त्याची उंची 554 फूट आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi