Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे आजही लोक करतात गोमूत्राने आंघोळ

येथे आजही लोक करतात गोमूत्राने आंघोळ
, सोमवार, 23 मे 2016 (11:27 IST)
गाय आणि बैलांवर दक्षिण सुदानमधील मुंदारी जमातीचे आदिवासी अतूट प्रेम करतात व आपल्या कुटुंबातील सदस्यच त्यांना मानतात. गायीची पूजा करणे आणि त्यांची देखभाल करणे हे त्यांचे एकमेव काम आहे.
 
यात विशेष म्हणजे गोमूत्राने मुंदारी प्रजातीचे लोक आंघोळ करतात, कारण यामुळे कोणताही रोग होत नाही व त्वचेचा रंग हलका नारंगी होतो, जो त्यांना चांगला वाटतो, असे त्यांचे म्हणणे. इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी मुंदारी जमातीचे लोक गायीचे कच्चे दूध पितात. येथे देवाप्रमाणे गायीची पूजा केली जाते. त्यांचे म्हणणे आहे की, गायच त्यांचे जीवन वाचवू शकते, त्यामुळे ते बंदुका घेऊन गायीचे संरक्षण करतात.
 
दरवर्षी 3 लाख 50 हजार गायी आणि बैलांची चोरी दक्षिण सुदानमध्ये होत असल्यामुळे 2 हजार 500 लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या जमातीतील महिला शेणाच्या गोवर्‍यापासून बनवलेली राख टॅल्कम पावडर म्हणून वापरतात व चेहर्‍यावर लावतात. यामुळे त्वचा गोरी होते, असे येथील स्थानिक नागरिक मानतात. या जमातीच्या जगण्याचा महत्त्वाचा भाग गोवर्‍यांची राख आहे. याच राखेवर हे लोक झोपतात तसेच आजारांवर इलाजही राखेनेच करतात. सुदानच्या उकाडय़ातून ही राख त्यांना वाचवते असेही त्यांना वाटते. एका गायीची अथवा बैलाची सुदानमध्ये किंमत जवळपास 500 डॉलर एवढी आहे. गाय आणि बैलांना येथे वीर योद्धा आणि जीवरक्षकाच्या धर्तीवर पुजले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

किरण बेदी पुडुचेरीच्या नायब राज्यपाल