Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विश्व विक्रम करणार 7 फुटाचा कुत्रा

विश्व विक्रम करणार 7 फुटाचा कुत्रा
हा कुत्रा ब्रिटेनमधील साऊथ वेल्सच्या पेनमाएनमध्ये राहणारा असून या कुर्त्याचे नाव मेजर आहे. त्याची उंची 7 फूट आणि वजन 76 किलो आहे. 
 
हा जगातील सर्वात उंच कुत्रा असल्याचा दावा त्याचे मालक ब्रायन आणि जूली विलियम्स करत आहेत. विशेष म्हणजे हा कुत्रा खूपच आळशी आहे. तो 22 तास झोपतो. अनेकदा तर तो स्वत:च्याच सावलीने घाबरुन जातो.
 
कुर्त्याचे मालक याबाबत सांगतात की, याची उंची अजून वाढत असून लवकरच त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डस्मध्ये येणार आहे. 7 फुटाचे आणखी 2 अन्य कुत्रेदेखील अस्तित्वात आहेत. एक एसेक्समध्ये तर दुसरा अमेरिकेत आहे. अमेरिकेच ग्रेट डेनचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाऊस उघडीपीनंतर रस्तंची दुरुस्ती