Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सिंघम' राहुलपुढे हात जोडून उभे माया, अखिलेश

'सिंघम' राहुलपुढे हात जोडून उभे माया, अखिलेश
उत्तर प्रदेशात पुढल्या वर्षी होणार्‍या निवडणुकीआधीच पोस्टवार सुरू झाले आहे. अलीकडेच बसप ने मायावतीला देवीच्या रूपात दाखवून स्मृती ईराणींचे कापलेले डोके त्यांच्या हातात दाखविले होते तसेच, भाजप प्रदेश अध्यक्ष केशव मौर्य यांना पोस्टरमध्ये कृष्ण बनवण्याचा वाद संपला नव्हता की आता एक आणखी पोस्टर आले आहे जे सध्या चर्चेत आहे. यात राहुल गांधी यांना सिंघम म्हणून चित्रित केले आहे. यात राहुल 27 वर्षांपासून प्रदेशाला लुटत असलेल्या सरकारपासून वाचण्याचा दावा करत आहे.
पोस्टरमध्ये प्रदेश सरकारला दंगा करणार्‍या लोकांचा पाठीराखा म्हणून तर मायावतीला फसवणूक आणि भ्रष्टाचारमध्ये सहभागी असल्याचे दाखविले आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष केशव मौर्य यांना आरोपी तर ओवैसी यांना समाजात द्वेष पसरविणारा असे म्हटले आहे.
 
पोस्टरमध्ये सर्वांना राहुल गांधी यांच्यासमोर हात जोडून माफी मागताना दाखविले आहे. सध्या हे पोस्टर चर्चेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वधूची 'परीक्षा', वर करत होता प्रतीक्षा...!