Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बदाम बर्फी

बदाम, साखर, आरारोट

बदाम बर्फी
साहित्य- पाव किलो बदाम, पाव किलो जाड दाण्यांची साखर, एक चमचा आरारोट, 2-3 वर्क.

NDND
कृती- बदाम 2-3 वेळा पाणी बदलवून चांगले रगडून धुवून घ्या. बदामांना 12 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर सालं काढून स्वच्छ पाण्यात टाका. नंतर एका चाळणीत टाकून थोडे कोरडे करून घ्या. या बदामांची मिक्सरमधून पूड तयार करून घ्या. यात साखर एकत्र करून या मिश्रणाला एक तास तसेच ठेवून द्या. नंतर पितळी पातेल्यात हे मिश्रण घेऊन मंद आचेवर भाजा.

हे मिश्रण कढईपासून सुटायला लागेल त्यावेळी कढई गॅसवरून उतरवून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर चांगले मळा. पोळी पाटावर आरारोट टाकून वरील मिश्रणाचा गोळा घेऊन इच्छेनुसार जाडसर लाटून घ्या. वरून थोडे तूप लावून वर्क चिकटवा. आपल्या आवडत्या आकारात कापून घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi