Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या आमच्या आपल्या मराठी भाषेबद्दल

जाणून घ्या आमच्या आपल्या मराठी भाषेबद्दल
* मराठी भाषा - मराठी ही इंडो-युरोपीय भाषा कुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे आणि या भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे.
 
* मराठी राजभाषा दिन - मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस
हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. 1987 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.
 
जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी भाषा भारतासह काही अन्य देशांतही बोलली जाते, जसे -
 
मॉरिशस
इस्रायल
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
संयुक्त अरब अमीरात
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
सिंगापूर
जर्मनी
युनायटेड किंगडम
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
 
तसेच भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू व छत्तिसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित
प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात असलेले भाग -
 
दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद (गुजरात)
बेळगाव
हुबळी-धारवाड
गुलबर्गा
बिदर
कारवार (कर्नाटक)
हैदराबाद (आंध्रप्रदेश)
इंदूर, ग्वाल्हेर (मध्यप्रदेश)
तंजावर (तामिळनाडू)
 
देशातील ३६ राज्ये आणि ७२ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५०० शे वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले जाते. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
 
आद्यकाल
यादवकाल
बहामनी काळ
शिवाजी महाराजांचा काळ
पेशवे काळ
इंग्रजी कालखंड
 
* मराठीतील बोली भाषा
 
अहिराणी
इस्रायली मराठी
कोंकणी
कोल्हापुरी
खानदेशी
चंदगडी बोली
चित्पावनी
झाडीबोली
डांगी
तंजावर मराठी
तावडी
देहवाली
नंदभाषा
नागपुरी
नारायणपेठी बोली
बेळगावी
भटक्‍या विमुक्त
मराठवाडी
माणदेशी
मॉरिशसची मराठी
मालवणी
 
वर्‍हाडी
कोळी
 
* तक्त्यात नसलेली मराठी अक्षरे -
 
च़ छ़ झ़ ञ़ शेंडीफोड्या श आणि मराठी ल आणि ख
ऱ्य
ऱ्ह
पाऊण य

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तीन मुलांचा शेततळ्यात पडून मृत्यू