Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुसुमाग्रज Kusumagraj (विष्णु वामन शिरवाडकर) निबंध मराठी

kusumagraj
, सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (10:49 IST)
नाटककार कथाकार, कादंबरीकार काव्य लेखक विष्णु वामन शिरवाडकर कुसुमाग्रज जीवन परिचय 
विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार, कादंबरीकार, काव्य लेखक, व समीक्षक होते. यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्राच्या पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन असे झाले.
 
यांचे वडील वकील होते. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे टोपणनाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. 
 
नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए. ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.1933 साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
 
 स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केले. सत्याग्रहातही यांनी भाग घेतला. त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. तत्पश्चात ते मुंबईला आले त्यांना तिथे मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव यांची भेट घेतली. त्यांनी ह्यांना नाटक लिहिण्यास प्रवृत्त केले. कवी असलेले कुसुमाग्रज यशस्वी नाटककार झाले. त्यांनी आपल्या लेखणी मधून सामाजिक अन्याय आणि विषमता या विषयांवर कठोर टीका केली. 
 
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी हाताळले.
 
त्यांचे साहित्यिक विचार लौकिकतावादी आहे. ते आत्मनिष्ठ व समाज निष्ठा जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. कविता, नाटक, कादंबऱ्या, कथा, लघु निबंध इत्यादी प्रकाराचे साहित्य त्यांनी हाताळले. त्यांचे काही नावाजलेले साहित्य काव्य संग्रह- जीवन लहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल, विशाखा. नाटक- दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट,. कादंबऱ्या - वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर हे त्यांचे साहित्य आहे.
 
वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिकार होते. त्यांचे निधन 10 मार्च 1999 रोजी झाले. वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली.
 
त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. मराठी भाषेचे महत्त्व सांगण्यासाठी शाळेमध्ये निबंध, भाषण, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच अनेक संस्था पण लोकांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व दर्शविण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित करतात. 
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
 
पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार
’मराठी माती’ला 1960 साली मिळाला.
’स्वागत’ला 1962 साली मिळाला.
’हिमरेषा’ला 1962 साली मिळाला.
’नटसम्राट’ला 1971 साली मिळाला.
’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार 1974
"ययाती आणि देवयानी" या नाटकास 1966या वर्षी तर संगीत "वीज म्हणाली धरतीला" या नाटकास 1967 मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.
विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार (1991 साली)मिळाला.
भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा "राम गणेश गडकरी" पुरस्कार त्यांना 1965 मध्ये प्राप्त झाला‌.
अंतराळातील एका ताऱ्यास "कुसुमाग्रज" हे नाव दिले गेले आहे.
1974 साली 'नटसम्राट' नाटकाला 'साहित्यसंघ' पुरस्कार मिळाला.
1986 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डि.लिट्' ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
1988मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला.
 
वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान
1960 मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
1964  मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
1970 साली कोल्हापूर येथे भरलेल्या 51व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
1990 साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते.
त्यांचा जन्म दिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर