Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ‘एक परिच्छेद विकिपिडियावर’

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ‘एक परिच्छेद विकिपिडियावर’
मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन पाळला जातो.
 
२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन, या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे गेट वे ऑफ इंडियावरील भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होणार आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच यानिमित्ताने आणखी एक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, ती म्हणजे ‘एक परिच्छेद विकिपिडियावर’. यात मराठी भाषा गौरव दिनी, जगभरातील मराठी भाषकांनी मराठी देवनागरी लिपीतील किमान १ परिच्छेद मजकूर ‘मराठी विकिपीडियावर’ टाईप करावयाचा आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी भाषा दिन विशेष : कुसुमाग्रज