Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्याशक्ती

विद्याशक्ती
WDWD
विद्या हे परमपद, परमतत्व आहे. विद्या हे मनुष्याच्या जीवनाचे परमलक्ष्य आहे. भगवान शिवाचे शिवत्व विद्यामय असल्यामुळेच आहे. तो विद्येचाच प्रभाव आहे. विद्येशिवाय पशु-पक्षी नाहीत. विद्या हे अमृत आहे. विद्येशिवाय जिवंत राहणे म्हणजे मृत व्यक्तीप्रमाणे आहे. या सिद्धांतात काही संशय नाही. कोणतीही अपप्रवृत्ती नाही. श्रुती, स्मृती, इतिहास, पुराण आणि दर्शन इत्यादी सर्व एकाच स्वरात भगवती विद्येची प्रशंसा करतात. सर्व सिद्धांतात विद्या मोक्षासाठी आवश्यक केली आहे. विद्याविना मोक्ष नाही. मोक्ष हा परमपुरूष आहे. म्हणून विद्या प्राप्त करणे हे मानवी जीवनाचे परम लक्ष्य आहे.

विद्या प्राप्त करणे म्हणजे एखाद्या अशा वस्तुचा लाभ की तिचा एकही रूपया खर्च व्हायला नको. लाभ मिळाल्यावर ती पुन्हा मागे हटायला नको. विद्येची अशा प्रकारे प्राप्ती झाल्यावर दु:ख निवारण आणि परमानंद मिळू शकतो. विद्या प्राप्त करणे हे प्रत्येक बुद्धीवंताचे आद्य कर्तव्य आहे. जो मनुष्‍य त्याचे जीवन वाईट कार्यासाठी वाया घालतो तो ('सौवणैंलगिलाग्रैर्विलिखति वसुधामर्कमूलस्य हेतो:।') आत्मघाती आणि शरीर वासनेच्या ('अंन्ध तम: प्रविशति।') अधीन असतो.

विद्या प्राप्त केल्याशिवाय विद्येचे स्वरूप समजणे शक्य नाही. साधारणत: विद्या या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला माहित आहे. परंतु, येथे थोडक्यात त्याची माहिती देऊन चालणार नाही. विद्यावान तसे तर कित्येक लोक असतात पण कुणालाच अमृतत्व प्राप्त झालेले नाही. श्रुतीचे वचन आहे की, 'सा विद्या या विमुक्तये' ज्या पासून मुक्ती प्राप्त होते तीच विद्या आहे. एवढेच नाही तर विद्या शब्दाद्वारे फक्त साधन रूपा विद्या ही श्रुत्यभिप्रेत नाही. 'अमृतं तु वि द्या', विद्या शक्ति: समस्तानां शक्तिरित्यभिधीयते' इत्यादी श्रुतिवाक्यांमधून विद्या साध्य रूपा-परमार्थरूपा पण म्हटली गेली आहे.

विद्या ही संपूर्ण शक्तीची मूळ शक्ती आहे. ती सच्चिदानंद रूपात आहे. 'विद्यते देशकालनवच्छिन्नत्वेन वर्तते या सा विद्या.' विद् सत्तायाम्' या धातुपासून किंवा विद्ज्ञाने' -विद्यते, ज्ञायते या व्यु‍त्पत्तिहून, किंवा 'विद्ललाभे' या धातुपासून परमानंद रूपत्वेन लभनीया, या व्युत्पत्ति द्वारे सच्चिदानन्दरूपा परमा शक्तिर्विद्या' हा अर्थ विद्येपासूनच निघतो.

अग्निचा संबंध जसा दाहकता आणि उष्णतेशी असतो तसाच संबंध ब्रह्मचा या शक्तिपासून आहे. अक्षमालिकोपनिषद् मध्ये 'यत सूत्रं तद् ब्रह्म', 'यत सुषिरं सा विद्या' हे सांगून ब्रह्म आणि विद्येचा संबंध रूपकाद्वारे प्रकट करण्यात आला आहे. शंकराचार्यांनी 'परमब्रह्ममहिर्षी' म्हणत याच भावाचे द्योतन केले आहे. 'परमाह्यदशक्ति' म्हणणार्‍या वैष्णवाचार्यांचे दुसरे अभिप्राय होऊ शकतात? हीच शक्ती जेव्हा सृष्टयुन्मुख होते, अविद्या शक्तीचे क्रमश: विकास होऊ लागतो. संहार क्रम प्रारंभ होताच संपूर्ण अविद्या-शक्ती पुन्हा परत येऊ लागतात आणि प्रत्यावर्तन होऊ लागते. एकाच शक्तीद्वारे विकास संकोच दोन्ही कामे होतात. याच आशयाला उपनिषद्चा खालील दिलेले उदाहरण प्रकट करतात.

द्वे अक्षरे ब्रह्मपरे अनन्ते
विद्याविद्ये निहिते यत्र गूढे
क्षरन्त्वविद्या अमृतं तु विद्या
विद्याविद्ये ईशते यस्तु सोऽन्य:।

बंध व मोक्ष यांचे कारण तेच एक आहे
सा विद्या परमा मुक्तेर्हेतुभूता सनातनी।
संसारबन्धहेतुश्च सैव सर्वेश्वरेश्वरी।

विद्या हे परमानंद रूप व परमाराध्याय शक्ती आहे. परंतु या मूलभूत शक्तीचे यथावत् ज्ञान फक्त नैर्गुण्यस्थ अद्वैतसिद्धान्तपरिनिष्ठित योगींनाच आत्मानुभवाद्वारे होऊ शकते. यासाठी साधारण जीवांच्या कल्याणासाठी विद्येच्या गुणत्रयानुरूप रूपत्रय सांगितले गेले आहे. बृहज्जाबालोनिषद् मध्ये विद्याच्या संदर्भात हे सांगितले आहे-
विद्याशक्ती: समस्तानां शक्ती, रित्यभिधीयते।
गुणत्रयाश्रया विद्या सा विद्या च तदाश्रय ।।

सप्तशतीच्या शक्रादिस्तुतीमध्ये ही गोष्ट ‍विभिन्न शब्दांमध्ये सांगितली गेली आहे-
हेतु: समस्तजगतां त्रिगुणापि दोषै र्न ज्ञायसे हरिहरादिभिरप्यपारा।
सर्वा श्रयाखिलमिंद जगदं शंभू तमव्याकू ती हि परमा प्रकू तिस्त्वमाद्या।।

आधिभौतिकी विद्या- या विद्येच्या साधारण रूपाला सर्वजण ओळखतात. विद्येते ज्ञायते अनथा (ज्याच्याद्वारे जायला पाहिजे) या व्युत्पत्तीपासून ' विद् ज्ञाने' धातुपासून तयार झालेला शब्द आहे. त्याचे ज्ञान राशी असून ते वैध आहे. ते सर्व या विद्येच्या अंतर्गत आहे. येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की केवळ थोडेसे माहित करून घेणे म्हणजे वास्तविक विद्या नाही. विद् धातु आणि ज्ञा धातुचा अर्थ समजण्यासारखा आहे.

जर्मनीत ज्ञा धातुपासून तयार झालेला शब्द 'Kentniss' आणि विद् धातुपासून बनलेला ' Weisheit' शब्द आहे. इंग्रज‍ीत अशाच प्रकारे 'Knowledge' आणि 'Wisdom' हे शब्द आहेत. या शब्दाच्या अर्थात तारतम्य असल्याचे सर्वांना माहित आहे. असाच अर्थभेद पूर्वीपासून संस्कृत धातुद्वयात चालत आला आहे.

आध्यात्मिक विद्या: ही विद्या 'विद् सत्तायाम्' पासून सिद्ध विद्या अखंड सत्तेचे द्योतक आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi