Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एशिकल हॉकिंगमध्ये करिअरच्या उत्तम संधी

एशिकल हॉकिंगमध्ये करिअरच्या उत्तम संधी

वेबदुनिया

WD
एखादा एथिकल हॅकर हा कॉम्प्युटर आणि नेटवर्क स्पेशालिस्ट असतो. तो ज्याच्यासाठी काम करत असतो त्याकरिता तो दुस-याची डिफेन्स सिस्टीम भेदत असतो. प्रतिस्पर्धी कंपनी अथवा शत्रू राष्ट्र यांच्या वेब यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेत हॅकिंग केले जाते. त्यामुळे सध्या माहिती-तंत्रज्ञान व्यवसायाचा एथिकल हॅकिंग हा अविभाज्य भाग बनला आहे.

सध्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात या व्यवसायाला उज्वल भवितव्य असल्याचे दिसले आहे. सर्व कंपन्या आणि उद्योग यांना माहिती सुरक्षेसाठीचे अधिकारी (इन्फर्मेशन सिक्युरिटी पर्सनल) नियुक्त करणे बंधनकारक झाले आहे. सध्या देशातील उद्योग आणि कंपन्यांची लक्षात घेता दरवर्षी सुमारे ७७ हजार एथिकल हॅकर्सची जरूरी पडते; मात्र वर्षभरात फक्त १५ हजार एथिकल हॅकर्स उपलब्ध होतात. एथिकल हॅकर हे पद भूषवणा-या व्यक्तीला तो ज्याच्यासाठी काम करणार आहे, त्या कंपनीचा मौल्यवान डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे लागेल याचा नेमका आराखडा तयार करावा लागतो.


webdunia
WD
प्राथमिक दृष्ट्या हे काम करण्यासाठी सी, सी++, पर्ल, पायथॉन आणि रुबी या एनकोडींग लँग्वेजेस आत्मसात करण्याची गरज आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज, लीनक्स या वेगवेगळ्या प्रणालींची तोंडओळख असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच नेटवर्क डिव्हाईसेस, राऊटर्स, काऊंटिंग स्विचेस, फायरवॉल्स यांचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. एथिकल हॅकर काय करू शकतो? तो ज्या कंपनीत, उद्योगात अथवा व्यक्तीसाठी काम करतो आहे त्याचा डाटा कोणी सुरक्षायंत्रणा भेदून चोरी करू नये यासाठी प्रतिबंधक यंत्रणा उभी करणे हे त्याचे मुख्य काम असते. यासाठी त्याला त्या कंपनी अथवा उद्योगातील सर्व नेटवर्कच्या सुरक्षाव्यवस्थेत काही त्रुटी आहेत का हे शोधावे लागते.

या त्रुटी हॅकर्सना शोधता येऊ नयेत किंवा शोधता आल्या तरी त्या भेदता कशा येणार नाहीत यासाठीची व्यवस्था तयार करणे ही त्याच्यावरील प्रमुख जबाबदारी असते. यासाठीचे आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वर्षाला अडीच लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. एका वर्षाच्या अनुभवावर एखादा तरुण पाच लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळवू शकतो.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi