Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बना स्ट्रक्चरल इंजिनिअर्स

बना स्ट्रक्चरल इंजिनिअर्स

वेबदुनिया

ज्यावेळी एखाद्या इमारतीचे डिझाइन तयार केले जात, तेव्हा सर्वात जास्त लक्ष भविष्यात येणा-या वादळ, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये ती सुरक्षित कशी राहिल याकडे दिले जाते. त्यासाठी विशिष्ट गोष्टींवर लक्ष देऊन इमारतीचे डिझाईन तयार केले जाते. हे डिझाइन स्ट्रक्चरल इंजिनिअर तयार करतात. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमध्ये इमारत सुरक्षित राहून जीवीतहानी टाळता येऊ शकेल. सध्याचा आणि आगामी काळाचा मागोवा घेतला तर वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पाश्र्वभूमीवर वर्तमानात आणि भविष्यातही स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची मगाणी वाढत आहे, असे दिसून येईल.

करिअरची वाट निवडतांना वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील गरज ओळखून योग्य मार्ग निवडावा. म्हणजे करिअरच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अशाच वेगळ्या शैक्षणिक शाखेपैकी एक शाखा म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरींग होय. स्ट्रक्चरल इंजिनिअरींग ही सिव्हिल इंजिनिअरिंगची एक उपशाखा आहे. सिव्हिल इंजिनिअर्स हे रिअल इस्टेटच्या निरनिराळ्या पैलूंकडे बघतात. ते पूल, रोडवेज, धरण, ओव्हर ब्रिज इत्यादींची निर्मिती करतात. तर स्ट्रक्चरल इंजिनिअर हे प्रोजेक्टचा आराखडा, आधारशिला डिझाईन करतात. या व्यक्ती प्रामुख्याने डिझाइनमध्ये कुशल असतात. म्हणजे विस्तृतपणे सांगायचे तर ज्यावेळी एखादी इमारत डिझाइन केली जाते, तेव्हा सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते भविष्यात येणा-या आपत्ती म्हणजे वादळ, भूकंप इत्यादींपासून तिचे संरक्षण व्हावे याकडे. यासाठी काही विशिष्ट बाबींवर लक्ष देऊन इमारतींची डिझाइन तयार करतात त्यांना स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असे म्हणतात. आज काळानुसार या इंजिनिअर्सना असणारी मागणी वेगाने वाढलेली आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअर्स हे घर, थिएटर, मॉल्स, स्पोर्टस व्हेन्यू, ऑफिस इत्यादीचे डिझाईन्स तयार करतात. त्यांचे काम तणावपूर्ण असते. आपत्तीच्यावेळी माणूस पुर्णपणे सुरक्षित राहिल असे डिझाइन त्यांना तयार करायचे असते.

webdunia
WD


पात्रता : स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम सिव्हिल किंवा मॅकेनिकलमध्ये पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पातळीवर केला जातो. म्हणजे सिव्हिल आणि मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. केल्यानंतर एम.टेक.मध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रामुख्याने केले जाते. इतर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाप्रमाणेच यामध्ये देखील बारावी किंवा त्याच्याशी समकक्ष गणित, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त होणे गरजेचे असते. प्रवेश परीक्षेद्वारे वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. राष्ट्रय पातळीवर देखील प्रवेश परीक्षांंचे आयोजन केले जाते. प्रवेश परीक्षेसाठी आयआयटीसारख्या प्रमुख इंजिनिअरिंग शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश अर्ज मिळतो. एम.टेक. अभ्यासक्रमाच्या कालावधी दोन वर्षांचा असतो.


webdunia
WD
स्ट्रक्चरल इंजिनिअर बनायचे असल्यास काही वैयक्तिक अंगभूत गुण असणे गरजेचे असते. ही व्यक्ती निर्मितीक्षम असणे गरजेचे असते. तसेच समूहात काम करण्याचे कौशल्य तिच्याकडे असले पाहिजे. या व्यक्तीकडे संचारकुशलता असणे अत्यंत गरजेचे असते. तसेच त्यांना दबावामध्ये आणि दीर्घकाळ काम करण्याची सवय असली पाहिजे. कॉम्प्युटर अ‍ॅडेड ड्राफ्टिंग म्हणजे सीएडी सॉफ्टवेअरबाबत व्यवस्थित माहिती असणे गरजेचे असते. याच सॉफ्टवेअरच्या मदतीने डिझाइनिंगचे पूर्ण काम केले जाते.


webdunia
WD
रोजगाराच्या संधी : स्ट्रक्चरल इंजिनिअर्सची मागणी वेगाने वाढत आहे. निरनिराळ्या बांधकाम कंपन्यांमध्ये या व्यक्तींना उत्तम नोकरी मिळते. त्यांना डिझाइनिंगमध्ये कुशल असणे गरजेचे असते. हे डिझाइन रिअल इस्टेटचे असो किंवा मॅकेनिकल म्हणजे शिप, जहाज किंवा एखाद्या यंत्राचे डिझाइन असो; शिक्षण घेतल्यानंतर या व्यक्ती सरकारी आणि खासगी अशा कुठल्याही कन्स्ट्रक्शन फर्ममध्ये नोकरीचा शोध घेऊ शकतात. या व्यतिरिक्त पी.एच.डी केल्यानंतर निरनिराळ्या इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून देखील काम करता येते. इतकेच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय म्हणजे सल्लागार म्हणून काम सुरू करता येते.

स्ट्रक्चर इंजिनिअर्सना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारेच वेतन असते. सुरुवातीला ट्रेनी म्हणून रूजू झाल्यानंतर १२ ते २० हजार रूपये प्रती महिना वेतन मिळते. या विषयात प्राविण्य मिळवलेल्या प्राध्यापकांना ४० ते ५० हजार रूपये मासिक वेतन मिळते. याव्यतिरिक्त ब-याच परदेशी कंपन्या स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना उत्तम वेतन देऊन भारतातून बोलावून घेत असतात. अशी संधी प्राप्त झाल्यास अधिक कमाई करता येणे शक्य होते.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi