Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेरोजगार तरुणांना खुशखबर

बेरोजगार तरुणांना खुशखबर

वेबदुनिया

WD
बेरोजगार तरुणांना खुशखबर आहे. चालू आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये विविध सरकारी बँका आठ हजार नव्या शाखा सुरू करणार आहे. यामुळे देशातील बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहेत. जवळपास ५० हजार लोकांना ही संधी उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या थेट अनुदान योजनेनुसार लाभार्थीच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. या पाश्र्वभूमीवर विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांना बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्यामुळे विविध सरकारी बँकांना शाखा वाढविणे आवश्यक आहे. विभागीय ग्रामीण बँक जवळपास दोन हजार शाखा सुरू करणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी वितरकाकडे रांगा लावण्याच्या वैतागातून ग्राहकांची सुटका होणार आहे. आता पेटड्ढोल पंपावरच ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे. ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे; परंतु यासाठी ग्राहकांना बाजार मूल्यात सिलेंडर खरेदी करावे लागेल. पेटड्ढोल पंपावर मिळणा-या सिलेंडरवर सरकारचे अनुदान मिळणार नाही. ते पूर्ण पणे विनाअनुदानित असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi