Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वनव्यवस्थापन अभ्यासक्रमाची संधी

वनव्यवस्थापन अभ्यासक्रमाची संधी

वेबदुनिया

WD
केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त भोपाळच्या भारतीय वनव्यवस्थापन संस्थेकडून पदव्युत्तर वनव्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. २0१४-१६ या वर्षासाठीच्या तुकडीसाठी हे अर्ज मागवले जात असून अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी २0१४ रोजी संपत आहे.

भारत सरकारच्या पर्यावरण व वने मंत्रालयाकडून निधी पुरवल्या जाणार्‍या संस्थेपैकी एक प्रमुख संस्था म्हणून भोपाळच्या भारतीय वनव्यवस्थापन संस्थेचा उल्लेख केला जातो. पदव्युत्तर वनव्यवस्थापन अभ्यासक्रमाअंतर्गत वनव्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन, उपजीविका आणि संवर्धन व्यवस्थापन आदी विषयांबाबत व्यवस्थापन कौशल्य दिले जाते. अलीकडच्या काळात सामुदायिक पर्यावरण जबाबदारी, कार्बन ट्रेडिंग, इको टुरिझम आदी क्षेत्रांत निर्माण होत असलेल्या करिअरच्या संधी लक्षात घेता वनव्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीचा ओढा वाढत आहे. या संस्थेकडून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात संस्था पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता उमेदवारांना सीएटी अर्थात सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. आयआयएम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते. सीएटीमध्ये प्राप्त गुणांच्या आधारावर निवडक उमेदवारांना गटचर्चा आणि मुलाखतीसाठी बोलविण्यात येते. भोपाळ, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू येथे गटचर्चा आणि मुलाखत घेतली जाते. निवडक उमेदवारांपैकी एकपंचमांश उमेदवारांना पाच हजार रुपये प्रति महिना शिष्यवृत्तीही दिली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi