गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. आता यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईत कंत्राटी पद्धतीने 3 हजार पोलिसांची भरती करण्यास हिरवा कंदील दिला आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने मुंबई पोलीस दलात 11 महिन्यांसाठी कंत्राटी पोलिस भरती करण्यासाठी मंजूरी दिली आहे. या साठी 30 कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या पदांवर घेण्यात येणार्या पोलिसांच्या पगारासाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे.
राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.