Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

AAI Recruitment 2022 भारतीय विमानतळ प्राधिकरणात 400 कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती

AAI Recruitment 2022 भारतीय विमानतळ प्राधिकरणात 400 कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी भरती
, गुरूवार, 9 जून 2022 (12:57 IST)
AAI Junior Executive Recruitment 2022: एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) द्वारे नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी चांगली आबती आहे. एयरपोर्ट अथॉरिटीने ज्युनिअर एक्जीक्यूटिव्ह (एयर ट्रॅफिक कंट्रोल) पदांवर बंपर भरती काढली आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार 15 जून पासून अधिकृत वेबसाइट aai.aero यावर ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. ही भरती 400 पदांसाठी आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारावर केला जाईल.
 
पात्रता आणि वयोमर्यादा
फिजिक्स आणि गणित सोबत विज्ञान (बीएससी) मध्ये तीन वर्षाची स्नातक डिग्री किंवा कोणत्याही विषयात इंजीनियरिंगमध्ये स्नातक डिग्री मिळवलेले उमेदवार ज्युनियअर एग्जीक्यूटिव्हच्या पदांसाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराचे वय अधिकाधिक 27 वर्ष असावे. उच्च वयोमर्यादा PWD साठी 10 वर्षे, SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांसाठी 3 वर्षे शिथिल आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही सूचना पाहू शकता.
 
अर्ज शुक्ल
उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल. अनुसूचित जाति/अनुसूचित जनजाति/महिला उमेदवारांना केवळ 81 रुपये भुगतान करावे लागेल. तथापि दिव्यांग आणि एएआय मध्ये एक वर्षाची अप्रेंटिस यश मिळवणारे ट्रेनीला अर्ज शुल्क नाही.
 
निवड प्रक्रिया
उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत त्यांच्या प्रदर्शनाच्या आधारावर शॉर्टलिस्ट केले जाईल आणि डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशन/वॉयस टेस्ट साठी बोलवण्यात येईल. डीवी/वॉयस टेस्टसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांचे रोल नंबर केवळ एएआअच्या वेबसाइटवर जाहीर केले जातील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Relationship Tips : हे तीन शब्द मैत्रिणीला बोलणे टाळा, नातं संपुष्टात येईल