Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

MahaTransco मध्ये तब्बल 223 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा

bijali
, गुरूवार, 5 मे 2022 (13:17 IST)
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य). या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 मे 2022 असणार आहे.
 
पद
सहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission)
सहायक अभियंत दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication)
सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil)
 
एकूण जागा - 223
 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सहायक अभियंता पारेषण - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 
सहायक अभियंत दूरसंचार- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. (Electronics & Telecommunication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 
सहायक अभियंता स्थापत्य - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelors Degree in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 
पगार
सहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission) - 80,962/- रुपये प्रतिमहिना
सहायक अभियंत दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication) - 80,962/- रुपये प्रतिमहिना
सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil) - 80,962/- रुपये प्रतिमहिना
 
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
 
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करा. 
 
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/msetclapr22/ या लिंकवर क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career Tips दहावी नंतर काय करावं