Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांगली बातमी ! नोकऱ्यांमध्ये फ्रेशर्सची मागणी वाढली

चांगली बातमी ! नोकऱ्यांमध्ये फ्रेशर्सची मागणी वाढली
, सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (10:15 IST)
नोकऱ्यांमध्ये नवे लोक किंवा फ्रेशर्सच्या मागणीत लक्षणीय सुधार करण्यात आले आहे. कोरोनाव्हायरसच्या साथीच्या रोगामुळे झालेल्या लॉकडाऊन मुळे नव्या लोकांच्या नोकरीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. 
 
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जून पासून भरतीसाठी नव्या नव्या लोकांसाठीची मागणी सुधारत आहे आणि या आर्थिक वर्षाअखेरी पर्यंत असेच कायम राहण्याची शक्यता आहे.
 
प्रामुख्याने शिक्षण तंत्रज्ञान आणि ई शिक्षण क्षेत्रात नवीन प्रतिभेच्या मागणीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. या  नंतर आरोग्य सेवा, मानव संसाधन तंत्रज्ञानं आणि आर्थिक तंत्रज्ञान या क्षेत्रात देखील नवीन लोकांसाठी रोजगाराच्या संधीमध्ये देखील सुधारणा होत आहे.
 
टीमलीज.कॉम आणि फ्रेशर्सवर्ल्ड.कॉम चे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख कौशिक बॅनर्जी यांनी सांगितले की 25 मार्च पासून ते 30 एप्रिल दरम्यान नवीन लोकांसाठी भरती कमी होऊन केवळ 1.5 लाखांवर आली, तर दरमहा सरासरी हे 5 लाख रुपये असते.
 
बॅनर्जी म्हणाले की आता परिस्थितीत बऱ्यापैकी सुधारणा आहे आणि पोर्टल वर फ्रेशर्ससाठी सुमारे 3.5 लाख नोकऱ्या सूचीबद्ध आहे. ते म्हणाले की जून अखेर पासून नेमणुकाच्या स्थिती मध्ये सुधारणा झाली असून सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या कालावधीत ही वृत्ती आणखी मजबूत होण्याचे संकेत मिळत आहे.
 
बनर्जी म्हणाले की शिक्षण तंत्रज्ञान आणि ई शिक्षणा सह आरोग्य सेवा, एचआर तंत्रज्ञान आणि वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन लोकांची नेमणूक केली जात आहे. या शिवाय एफएमसीजी, आयटी आणि आयटीईस, उत्पादन, बीएफएसआय, टेलिकॉम आणि सेमीकंडक्टर उद्योगात ही भरती सुरू झाली आहे.
 
सीआयईएल एचआर सर्व्हिसेसचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदित्य मिश्रा म्हणाले की, मागणी कमी झाल्यामुळे बहुतेक कंपन्यांना परिणाम झाला आहे.पण आता ते सुधारण्याची अपेक्षा करत आहे. जानेवारी ते मार्च 2021 दरम्यान नेमणुकांची स्थिती कोविड-19 पूर्वीच्या पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीमध्ये दम्याच्या रुग्णांनी या 5 गोष्टींची काळजी घ्यावी