Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशसेवेची मोठी संधी! तब्बल १३८० जागांसाठी भरती; असा करा अर्ज

देशसेवेची मोठी संधी! तब्बल १३८० जागांसाठी भरती; असा करा अर्ज
, शुक्रवार, 10 जून 2022 (21:56 IST)
भारतात अनेक नामांकित सैन्य आणि सैनिक बटालियन असून त्यात आसाम रायफल्सवरचा क्रमांक लागतो. आसाम रायफल्सने क्षेत्रात अनेक पराक्रम गाजविले आहेत. तरुणांना आता रायफल आसाम रायफल्स मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. आसाम रायफल्समध्ये सरकारी नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट देत आहोत, आसाम रायफल्स, शिलाँगच्या महासंचालनालयाने तांत्रिक आणि अन्य पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
 
संचालनालयाने 12 एप्रिल 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हवालदार, रायफलमन, नायब सुभेदार आणि वॉरंट ऑफसरच्या एकूण 1380 पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड भरती मेळाव्याद्वारे जाहिरात केलेल्या पदांसाठी केली जाईल.
 
नोकरीसाठी ईच्छुक असलेले आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट assamrifles.gov.in ला भेट देऊ शकतात, आसाम रायफल्समध्ये जाहिरात केलेल्या पदांच्या घोषित रिक्त जागांसाठी भरती विभागात दिलेल्या लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून अर्ज पृष्ठावर अर्ज करू शकतात. त्यानंतर उमेदवार विचारलेले तपशील भरून आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करू शकतील.उमेदवारांनी नोंद घ्यावी की सोमवार, दि. 6 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 20 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. अर्जादरम्यान, उमेदवारांना 100 रुपयांचे शुल्क ऑनलाइनद्वारे भरावे लागेल. SC, ST आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
 
हवालदार लिपिक – मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टाइपिंगचा वेग. वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे.नायब सुभेदार धार्मिक शिक्षक – भूषणसह माध्यमिक किंवा हिंदीसह संस्कृतमध्ये बॅचलर पदवी. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे.हवालदार ऑपरेशन रेडिओ आणि लाइन – संबंधित ट्रेडमध्ये मॅट्रिक आणि आयटीआय किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे. इतर पदांच्या पात्रता आवश्यकता आणि इतर भरती तपशीलांसाठी आसाम रायफल्स भरती 2022 अधिसूचना पहा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेम कविता : प्रेमा वर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते