Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

10 वी पास असणाऱ्यांसाठी टपाल खात्यात भरती, कोणत्याही परिक्षाची गरज नाही

10 वी पास असणाऱ्यांसाठी टपाल खात्यात भरती, कोणत्याही परिक्षाची गरज नाही
, सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (10:19 IST)
हिमाचल प्रदेश पोस्टल सर्कल भर्ती 2020 : हिमाचल प्रदेश पोस्टल सर्कलने बऱ्याच पदांसाठी भरती काढल्या आहेत. आपल्याला सांगू इच्छितो की या भरती ग्रामीण डाक सेवेच्या रिक्त पदांना भरण्यासाठी निघाल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया 07 ऑक्टोबर 2020 पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. नोकरी संबंधित सर्व माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील इत्यादींची माहिती खालील प्रमाणे आहे.
 
महत्वाची तारीख : 
अर्ज फी आणि नोंदणी सादर करण्याची प्रारंभिक तिथी : 07 ऑक्टोबर 2020  
नोंदणी आणि अर्ज फी सादर करण्याची शेवटची तिथी :  06 नोव्हेंबर 2020
 
पदांचा तपशील : 
ग्रामीण डाक सेवक (हिमाचल प्रदेश) : 634 पदे 
 
वय मर्यादा : 
या पदांवर अर्ज करण्यासाठी किमान वय वर्ष 18 आणि कमाल वय वर्षे 40 निश्चित केले गेले आहे. 
 
शैक्षणिक पात्रता : 
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त संस्थेकडून दहावी पास असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी अनिवार्य विषय म्हणून शिकवलं गेलं असेल. या शिवाय अनिवार्य शैक्षणिक पात्रते पली कडील पात्रता असणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकाराचे प्राधान्य मिळणार नाही.
 
वेतनमान (पदानुसार): 
जीडीएस बीपीएमसाठी - 12,000 रुपये ते 14,500 रुपये.
जीडीएस एबीपीएम / पोस्टल सेवकासाठी - 10,000 रुपये ते 12,000 रुपये.
 
अर्ज कसा करावा :
इच्छुक आणि पात्र उमेदवार ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांवर अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जावं. किंवा पुढील दिलेल्या लिंक वरून सूचनांना डाउनलोड करून त्या वाचा. सर्व माहिती मिळवून अर्ज प्रक्रिया 06 नोव्हेंबर 2020 पर्यंत पूर्ण करा. अधिक माहितीसाठी पुढील सूचना बघा.
 
अर्ज फी : 
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस पुरुष वर्गासाठी : 100 रुपये 
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिलांसाठी कोणती ही अर्ज फी देय होणार नाही.
 
निवड प्रक्रिया :
या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे होणार.
अधिकृत संकेत स्थळासाठी इथे http://www.appost.in/gdsonline/ क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे https://indiapostgdsonline.in/gdsonlinec3p2/Registration_A.aspx क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सायनसचा त्रास असल्यास हे घरगुती उपाय करून बघा