हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरोशन लिमिटेडने मॅकेनिकल इंजीनियर, सिव्हिल इंजीनियर, इलेक्ट्रिकल इंजीनियर आणि इंट्रूमेंटेशन इंजीनियरच्या विविध पदांसाठी अर्ज मागिवले आहेत.
इच्छुक उमेदवार हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइट hindustanpetroleum.com वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत 120 मॅकेनिकल इंजीनियर, 30 सिव्हिल इंजीनियर, 25 इलेक्ट्रिकल इंजीनियर आणि 25 इंट्रूमेंटेशन इंजीनियर यांच्यासह एकूण 200 इंजीनियरांची भरती केली जाणार आहे.
शैक्षिक योग्यता
अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एआयसीटीई द्वारे अनुमोदित/यूजीसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय/डीम्ड विश्वविद्यालयाहून (अनारक्षित, ओबीसी एनसी/ईडब्लूए उमेदवारांसाठी 60 टक्के गुणांसह आणि एससी/एसटी/दिव्यांगांसाठी 50 टक्के गुणांसह) संबंधित इंजीनियरिंग स्ट्रीममध्ये 4 वर्षांची डिग्री असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
एससी/एसटी/दिव्यांग जणांसाठी अर्ज शुल्क नाही. अनारक्षित, ओबीसी एनसी आणि ईडब्लूएस वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1180 रुपए इतकं आहे, ही रक्कम नॉन रिफंडेबल असेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित परीक्षा, जीडी आणि व्यक्तिगत साक्षात्कार या आधारावर केली जाईल.