आपल्याकडे MBBS, MD, MS आणि PHD ची पदवी असल्यास, आपल्यासाठी सायंटिस्ट डी आणि ई पदांसाठी अनेक नोकऱ्या निघाल्या आहेत. या नोकरींसाठी आपण 5 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकता.
उमेदवार या नोकरीसाठी ICMR च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता. चला तर मग याची सविस्तार माहिती जाणून घेऊ या.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सायंटिस्ट डी आणि ई पदांसाठी नोकऱ्या काढल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 5 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.
ICMR ने एकूण 65 पदांसाठी नोकऱ्या काढल्या आहेत. अधिक तपशीलवार माहिती उमेदवार अधिकृत संकेत स्थळावरून मिळवू शकतात.
आयसी एमआर चे अधिकृत संकेतस्थळ main.icmr.nic.in आहे. या सर्व भरती दिल्ली साठीच्या आहेत. सायंटिस्ट- ई पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमडी /एमएस इत्यादींची पदवी असणे आवश्यक आहे. या शिवाय कोणत्याही सरकारी आणि खासगी संस्थेत काम करण्याचा अनुभव असावा. उमेदवार सायंटिस्ट ई
पदांच्या पात्रतेची अधिक तपशीलवार माहिती अधिकृत संकेत स्थळावर वाचू शकतात.
सायंटिस्ट ई (मेडिकल) च्या एकूण 42 नोकऱ्या आहेत.
सायंटिस्ट ई (नॉन मेडिकल) साठी एकूण 1 पद आहे.
सायंटिस्ट डी (मेडिकल) साठी एकूण 16 पदे आहेत.
सायंटिस्ट डी (नॉन मेडिकल) साठी एकूण 1 पद रिक्त आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत सूचना आवर्जून वाचावी.
अर्ज करण्यासाठी येथे https://recruit.icmr.org.in/sce/index.php/login क्लिक करावे.