IB Recruitment 2022 Notification: इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO), कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), सुरक्षा सहाय्यक (SA), हलवाई-कम-कुक, केअरटेकर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 22 ऑगस्टच्या पूर्वी अर्ज करावा
पदांचा तपशील -
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ACIO), कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), सुरक्षा सहाय्यक (SA), हलवाई-कम-कुक, काळजीवाहू अशा एकूण 766 पदांसाठी ऑफलाईन अर्ज आमंत्रित केले आहे.
पदाचे नाव पदांची संख्या
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर I/Executive (Group-B)- 70 पदे
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी II/कार्यकारी - 350 पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी- 50 पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी- 50 पदे
सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी - 100 पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I (मोटर ट्रान्सपोर्ट) – 20 पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-ग्रेड-II (मोटर ट्रान्सपोर्ट)- 35 पदे
सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) – 20 पदे
हलवाई कम कुक - 09 पदे
केअरटेकर- 05पदे
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/टेक- 07 पदे
एकूण जागा -766
शैक्षणिक पात्रता-
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.यासोबतच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
अर्जाची तारीख-
अर्ज करण्याची शेवटची तारीख - अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे -
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो-
अर्ज प्रक्रिया-
इच्छुक उमेदवार त्यांची सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करून अर्ज करू शकतात.
पत्ता- सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021.