Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IOCL Recruitment 2022:इंडियन ऑयल मध्ये 1760 पदांसाठी भरती

Indian Oil Corporation Ltd
, शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (11:14 IST)
IOCL Apprentice Recruitment 2022: भारत ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 1760 पदांवर भर्ती, अर्ज 14 डिसेंबर पासून सुरू इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या बंपर पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 
 
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे ही  भरती 1760 पदांसाठी आयोजित केली जात आहे. या भरतीसाठी योग्य आणि इच्छुक अभ्यर्थी ऑनलाइन  iocl.com वर अर्ज करू शकतात. IOCL भर्ती 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 14 डिसेंबर ते 3 जानेवारी 2023 पर्यंत करू शकतात. IOCL भर्ती साठी पात्रता , वयोमर्यादा, पदांचा तपशील इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे. 
 
पात्रता -
 भरती परीक्षेसाठी 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती परीक्षेत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता मागवण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 50% गुणांसह अभियांत्रिकी उत्तीर्ण असावा. ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या पदासाठी उमेदवाराने किमान 50टक्के गुणांसह सात बीए, बीएससी, बीकॉम इ. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 
वयोमर्यादा-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
 
पदांचा तपशील-
1760 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदांचा समावेश आहे. या भरती परीक्षेतील निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, झारखंड, चंदीगड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी ठिकाणी होणार आहे.
 
निवड प्रक्रिया -
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. त्यासाठी उमेदवारांना चार पर्याय देण्यात येतील .

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

JEE Main 2023: जेईई मेन परीक्षा 24 जानेवारीपासून होणार, NTAने अधिसूचना जारी केली