ITBP Recruitment 2023: 10 वी उत्तीर्ण साठी नौकरीची सुवर्ण संधी आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) चा भाग होण्याची सुवर्ण संधी आहे. ITBP ने त्याच्या अधिकृत वेबसाइटवर 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी (ITBP भर्ती 2023) ऑनलाइन अर्ज जारी केलं आहेत. ITBP मध्ये सामील होण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ITBP कॉन्स्टेबल भर्ती 2023 मोहिमेंतर्गत, एकूण 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) गट 'C' नॉन-राजपत्रित (नॉन-मंत्रालयीन) पदांची संस्थेमध्ये (ITBP भर्ती) भरती केली जाईल.
तपशील -
या पदांसाठी (ITBP भर्ती 2023) शेवटी निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्समधील स्तर-3 अंतर्गत 21700-69100 रुपये (7 व्या CPC नुसार) वेतनश्रेणी मिळेल. उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे दरम्यान असावी आणि मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा 10 वी उत्तीर्ण असावी.
पात्रता -
उमेदवार मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून समकक्ष पात्रता असावा. तसेच वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा -.
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे दरम्यान असावी.
वेतनमान-
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पगार म्हणून 21700 ते 69100 रुपये पगार दिला जाईल
महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाइन अर्ज सुरू: 27 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023