Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

1,00,000 लोकांना नोकऱ्या देणार अमेझॉन, तासी पगार 1100 रुपये देणार..

amazon jobs India
, मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (16:57 IST)
कोरोनाच्या काळात नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली बातमी, ऑन लाइन ऑर्डर मध्ये वाढी दरम्यान ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन ने 1,00,000 नवीन लोकांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. नवीन नियुक्त्या तात्पुरती आणि कायम स्वरुपी दोन्ही पदांसाठी केल्या जाणार आहे. हे नवे कामगार ऑर्डरची पॅकिंग, डिलिव्हरी किंवा ऑर्डर क्रमवारी लावण्याचे काम करतील. या नियुक्त्या सुट्ट्याप्रमाणे होणार नाही असं कंपनीने स्पष्ट केले आहेत.
 
सिऍटलच्या ऑन लाइन असलेल्या या कंपनीचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. एप्रिल आणि जून दरम्यान कंपनीने विक्रमी नफा आणि केलेली कमाई नोंदविली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे लोकं किराणा माल आणि इतर वस्तू ऑनलाईन घेण्यास विशेष प्राधान्य देत आहे. 
 
ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनी पहिल्याच वर्षी 1,75,000 लोकांची भरती करणार होती. गेल्या आठवड्यात कंपनीने सांगितले होते की त्यांच्याकडे 33,000 कार्पोरेट आणि तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या आहेत आणि त्या पदांवर भरती करावयाची आहे. 
 
आता त्यांना आपल्या 100 नव्या गोदाम, पॅकेज निवडक सेंटर आणि इतर ठिकाणी नवीन लोकांची आवश्यकता असल्याचे कंपनीने सांगितले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी बोध कथा : लोभी राजन