सरकारी नौकरीच्या शोध असणाऱ्यांना चांगली संधी हे. 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना केंद्र सरकार मध्ये नौकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. सध्या नौदलात महाभरती करण्यात आली असून दहावी पास असाल तर त्वरित अर्ज करावे.
भारतीय नौदलाने भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षेची अधिसूचना जारी केली असून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 18 डिसेंबर पासून सुरु होणार आहे.
910 रिक्त पदांसाठी ही अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचं आहे.
अर्ज मुलींना देखील करता येणार आहे आणि त्यासाठी कोणतीही फीस लागणार नाही.
वयाचे बंधन ठेवण्यात आले असून उमेदवाराचे वय 18 ते 25 पर्यंत असावे.
या साठी पात्रता म्हणजे उमेदवाराने इयत्ता दहावी उत्तीर्ण केली असावी आणि आयटीआय असावा. चार्जमनच्या पदासाठी उमेदवार कडे संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा किंवा भौतिक आणि रसायनशास्त्रात पदवीधर असावा.
वरिष्ठ ड्राफ्ट्समन पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तर ड्राफ्ट्समनशिप साठी उमेदवाराने डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स घेतलेला असावा.
ट्रेड्समन मेटच्या पदासाठी उमेदवाराने दहावी तसेच आयटीआय असावे.
ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होणार असून अर्ज प्रक्रियाला सुरुवात 18 डिसेंबर पासून होणार असून शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.