राज्यातील वन विभाग रिक्त पदांमुळे सध्या ठप्प झाल्यासारखा दिसत आहे. पाचही संवर्ग मिळून असलेल्या २०,०९७ पदांपैकी १६,३८४ पदे भरलेली असून ३,४९७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे येत्या तीन महिन्यात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने हा आकडा पुन्हा वाढणार आहे.
राज्याच्या वन विभागामध्ये एकूण १०७ कॅडर आहेत. मात्र यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर कनिष्ठ श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांपर्यंतची अनेक पदे मागील चार वर्षांपासून रिक्त आहेत. दरवर्षी रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत असूनही नवीन पदे भरण्यात न आल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे वन विभागाचे कामकाज मंदावल्याची स्थिती आहे.
वन विभाग औरंगाबाद अंतर्गत गट-ड व गट-क अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची प्राथमिक जेष्ठता यादी जाहिर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड गट-ड https://drive.google.com/file/d/11k3xwe4nv1WpMUwI7D78hsXhR0XlvdvP/view
यादी डाउनलोड गट-क https://drive.google.com/file/d/1f_SBdwzl4YEzJPEW6lZqMq-7h_o12yuD/view
200 क्षेत्रीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त!! राज्याच्या वनविभागात एक – दोन नव्हे, तब्बल २०० क्षेत्रीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. हल्ली वणवा, वन्यजीवांचे संरक्षण, अतिक्रमण या महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असताना वरिष्ठ मात्र ही रिक्त पदे भरण्यासाठी कोणत्याही हालचाली करीत नसल्याचे वास्तव आहे.
अशी रखडली क्षेत्रीय वनाधिकाऱ्यांची पदोन्नती
विभागीय वन अधिकारी- ३५
सहायक वनसंरक्षक- ५५
वन परिक्षेत्र अधिकारी – ८५
वन परिक्षेत्र अधिकारी (पोस्टींग ॲडिशनल)- ४०