Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात लवकरच 7 हजार पोलिसांची भरती

maharashatra police
, गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (15:00 IST)
राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती दिली.
 
विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Drinking Enough Water Benefits पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे जाणून घ्या