Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

SBI मध्ये मेगा भरती

Mega recruitment in SBI
नवी दिल्ली , शनिवार, 27 एप्रिल 2019 (12:13 IST)
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) मध्ये येत्या काही महिन्यांत जवळपास 9,000 पदांची भरती होणार आहे. या पदांमध्ये लिपिक स्तरावरील पदांचा समावेश असणार आहे. बँकेने सांगितले की, आम्ही 8,904 रिक्त पदे भरण्याचा नि्रणय घेतला आहे. ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी विशेष जागा असणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होत असलेली ही मेगा भरती म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.
 
भारतीय स्टेट बँक (SBI) द्वारा बँकेच्या 17 विभागांत ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये देशभरातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. एसबीआयच्या केंद्रीय भरती आणि पदोन्नती विभागाने सांगितले की, 'उमेदवार केवळ एका राज्यातील रिक्त पदांसाठीच अर्ज करु शकणार आहेत.' उमेदवार या रिक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत केवळ एकच वेळी परीक्षेसाठी उपस्थित राहू शकतात. एखाद्या दुसऱ्या राज्यातील नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्या राज्यातील स्थानिक भाषेचं सखोल ज्ञान (वाचणं, लिहिणं, बोलणं) आवश्यक आहे.
 
बँकेच्या वार्षिक अहवालानुसार 2017-18 या कालावधीत केवळ 3,211 नवे कर्मचारी एसबीआयमध्ये भरती झाले. सेवानिवृत्तीआणि इतर कारणांमुळे नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 18,973 इतकी झाली त्यामुळे वर्षाच्या अखेरीस बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संखेत घट झाली.
 
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये होणाऱ्या बहुतांश भरती आता विशेष कामांसाठी किंवा भूमिकांसाठी होत असल्याचं पहायला मिळत आहे. बँक ऑफ बडोदामध्ये अशाच 1,407 नोकऱ्यांचा समावेश आहे. तर, या महिन्याच्या सुरूवातीला आयडीबीआय बँकेने सुद्धा जवळपास 950 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोकेदुखी पळवण्यासाठी हे करून बघा ....