Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१७ बँकामध्ये १२ हजार पेक्षा अधिक जागा, फी, फॉर्म आणि शेवटची तारीख सर्व माहिती

१७ बँकामध्ये १२ हजार पेक्षा अधिक जागा, फी, फॉर्म आणि शेवटची तारीख सर्व माहिती
इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) तर्फे बँकेतील क्लर्क पदासाठी भरती निघाली आहे. या २०१९ सालच्या भरतीबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, 17 सरकारी बँकांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी 17 सप्टेंबर 2019 ते 9 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल. या भरतीत 12 हजार 074 पदांसाठी ही भरती होणार आहे.
 
तीन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे, यामध्ये प्री अर्थात पूर्व परीक्षा आणि मेन्स अर्थात मुख्य परीक्षेत पात्र ठरल्यानंतर पुढील मुलाखत साठी संधी दिली जाईल.
 
‘या’ बँकांमध्ये भरती होणार त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
 
अलाहाबाद बँक
आंध्रा बँक
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र
कॅनरा बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
कॉर्पोरेशन बँक
इंडियन बँक
इंडियन ओवरसीज बँक
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
पंजाब नॅशनल बँक
पंजाब अँड सिंध बँक
सिंडिकेट बँक
यूको बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
युनायटेड बँक ऑफ इंडिया 
 
अर्ज करण्याची प्रक्रिया व प्रमुख तारखा
 
आयबीपीएस या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदरावांना ऑनलाईन (IBPS Clerk Recruitment 2019) माध्यमाद्वारे अर्ज करता येणार आहे. यासाठी ibps.in या वेबसाईटवर उमेदवारांनी भेट दयावी लागणार आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात – 17 सप्टेंबर 2019 तर शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2019 सोबतच पूर्व-परीक्षा प्रशिक्षण Pre-Exam Training (PET) – 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत असणार आहेत.  ऑनलाईन परीक्षांची तारीख – 7, 8, 14 आणि 21 डिसेंबर 2019 असणार असून परीक्षा निकाल निकाल – डिसेंबर 2019 किंवा जानेवारी 2020 या दरम्यान लागेल तर ही परीक्षा पास झाला तर पुढील मुख्य परीक्षा – 19 जानेवारी 2020 रोजी असणार आहे. सोबत, भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना पदवीधर असणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्याशाखेतून पदवीधर असल्यास आपण यात सहभागी होऊ शकता. बँकामध्ये कर्ल्कपदाच्या नोकरीसाठी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचा जन्म 2 सप्टेंबर 1991 च्या पूर्वी झालेला असणे गरजेचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या सहा सवयींमुळे आपण दिसताय वयस्कर