MPSC Recruitment 2023: नौकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 7510 रिक्त पदांवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या साठी अधिकृत संकेतस्थळावर नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत 7 हजार 510 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक आदि पदांसाठी भरती सुरु आहे.
राज्य उत्पादन शुल्क गृह विभागात दुय्यम निरीक्षक पदासाठी भरती सुरु आहे. या पदासाठी वेतनमान 32 हजार ते 1 लाख 1 हजार 600 रुपये आहे. तर पात्रता पदवीधर असावे.
तांत्रिक सहाय्य्क पदासाठी पात्रता पदवीधर असून वेतनमान उमेदवारांना दरमहा 29,200 ते 92,300 रुपये वेतनमान असेल.
कर सहाय्यकच्या 468 रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी टंकलेखन साठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट असून उमेदवार शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. या पदासाठी वेतनमान दरमहा 25,500 रुपये ते 81,100 रुपये वेतनमान दिले जाणार.
लिपिक-टंकलेखक पदासाठी उमेदवार ने पदवीधर असावे तसेच मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट असावा. या पदासाठीच्या उमेदवारांना 19,200 ते 63, 200 रुपये वेतनमान दिले जाईल.
या साठी उमेदवारांचे वय 1 मे 2023 रोजी 18-38 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात येईल.
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 17 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून उमेदवार 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करु शकतात. 17 डिसेंबर रोजी या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे.