Railway Recruitment 2023 : सरकारी नौकरी शोधणाऱ्या तरुणांना रेल्वेत नौकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने वर्ष 2023 -2024 साठी स्काऊट्स आणि गाईड कोट्यात भरती काढली असून गट क आणि गट ड साठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 6 नोव्हेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकता.
पात्रता-
या साठी पात्रता 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण आहे.उमेदवारांनी इयत्ता 12 वी किंवा त्याच्या समक्ष परीक्षेत मान्यता प्राप्त मंडळाकडून 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी.
अनुसूचित जाती/ जमाती /माजी सैनिक /दिव्यांग(पिडब्ल्यूडी) उमेदवारांना गुण सूट दिली आहे.
उमेदवारांची लिपिक सह टंकलेखनाचा वेग इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिटं आणि हिंदी शब्द प्रति मिनिट असा 2 वर्षाच्या आतील असावा.
वायो मर्यादा- गट ड लेव्हल 2 साठी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असावे.
गट क लेव्हल 1 साठी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे असावे.
वेतनमान-
गट क साठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 63200 रुपये वेतनमान मिळेल आणि
गट ड साठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56900 रुपये वेतनमान मिळेल.