Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

RBI Assistant 2022 :RBI मध्ये 950 सहाय्यक पदांसाठी भरती, पात्रता वाचा

RBI Assistant 2022 :RBI मध्ये 950 सहाय्यक पदांसाठी भरती, पात्रता वाचा
, मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (20:30 IST)
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने देशभरात पसरलेल्या त्याच्या विविध कार्यालयांसाठी सहाय्यकांच्या पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे 950 पदांवर भरती होणार आहे. सध्या आरबीआयने या भरतीसाठी सूचना जारी केली आहे. तपशीलवार अधिसूचना 17 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन अर्जाची प्रक्रियाही 17 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होईल. अर्ज करण्याची लिंक आरबीआयच्या www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर एक्टिव केली जाईल.
 
RBI असिस्टंट भरतीशी संबंधित 5 खास गोष्टी जाणून घ्या.
1. RBI ने म्हटले आहे की अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2022 असेल. 
2. प्रिलिम्स परीक्षा 26 मार्च आणि 27 मार्च रोजी घेतली जाईल.
3 ही पदे भरण्यासाठी RBI देशव्यापी स्पर्धा परीक्षा आयोजित करेल. सर्व प्रथम प्राथमिक परीक्षा होईल. यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षा त्यानंतर भाषा प्राविण्य चाचणी (LPT) द्यावी लागेल. 
4 पात्रता-RBI ने 2019-2022 मध्ये ही भरती देखील केली होती. पात्रतेचे निकष समान असतील अशी अपेक्षा आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुणांसह असणे अनिवार्य आहे.
5. वयोमर्यादा: किमान 20 वर्षे, कमाल 28 वर्षे
 आरक्षित श्रेणी, दिव्यांगजन, माजी सैनिक, विधवा आणि रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्याची तरतूद असेल.
6 वेतनमान: रु. 13,150 ते रु . 34,990
असिस्टंटला सुरुवातीला रु.36,091 मासिक वेतन मिळेल.
यामध्ये DA, TA इत्यादी सारख्या इतर भत्त्यांसह दरमहा 14,650 रुपये मूळ वेतन समाविष्ट आहे. 
7. निवडीची प्रक्रिया-या पदांसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना तीन ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागतील. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT).
 
8. परीक्षेचा नमुना- प्राथमिक परीक्षा 100 गुणांच्या 100 प्रश्नांसह एक तासाची असेल.
यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे 35 आणि रिझनींग एबिलिटी चे  35 प्रश्न विचारले जातील.
प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस बसण्यास पात्र असतील.
मुख्य परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न विचारले जातील ज्यासाठी उमेदवारांना 135 मिनिटे मिळतील.
यामध्ये रिझनिंग, इंग्रजी भाषा, न्यूमेरिकल एबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून 40-40 प्रश्न विचारले जातील.
प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची तरतूद आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.
 
9. मुख्य आणि एलपीटी परीक्षांचा नमुना - मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांना भाषा प्रवीणता चाचणी (LPT) साठी उपस्थित राहावे लागेल. 
- एलपीटी चाचणी संबंधित भागात बोलल्या जाणार्‍या स्थानिक भाषेत असेल. 
10. ऑनलाइन परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि दस्तऐवज पडताळणीत पात्र ठरल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उंदरांपासून पसरणारा लासा ताप, त्याची लक्षणे काय जाणून घ्या