भारतीय रिझर्व्ह बँकेने सहाय्यक पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारीपासून सुरु झाली असून शेवटची तारीख 8 मार्च आहे.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आरबीआयमध्ये 950 पदांवर सहाय्यकांची नियुक्ती केली जाईल. कोणत्याही विषयातून 50 टक्क्यांसह पदवी प्राप्त केलेले तरुण यासाठी अर्ज दाखल करु शकतात. इच्छुक उमेदवार रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईट rbi.org.in जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज दाखल सुरु झाल्याची तारीख - 17 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 8 मार्च 2022
परीक्षेची तारीख - 26 आणि 27 मार्च 2022
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय 1 फेब्रुवारी 2022 रोजी 20 ते 28 वर्ष असायला हवं. आरक्षित वर्गासाठी सूट देण्यात आली आहे. इतर मागास वर्गासाठी तीन वर्षे तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा तसंच लँग्वेज प्रोफिशिएन्सची टेस्ट परीक्षेच्या आधारावर केली जाईल. पहिल्या टप्प्याची परीक्षा 26 आणि 27 मार्च रोजी ऑनलाईन घेतली जाईल.
या प्रकारे करा अर्ज दाखल करा
आरबीआयच्या अधिकृत वेबसाईट https://opportunities.rbi.org.in वर जा
सहाय्यक पद भरती पर्यायावर क्लिक करा. नव्या रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करा.
तुमचं नाव, संपर्क आणि ई-मेल आयडीची नोंद करा, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा
यानंतर अर्जामधील आवश्यक माहिती भरुन सबमिटवर क्लिक करा.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल. पूर्व परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल. नंतर लँग्वेज प्रोफिशिएन्सी टेस्ट घेतली जाईल.
पगार
मासिक वेतन 36,091 असेल. शिवाय इतर भत्त्यांसह संपूर्ण पगार मिळेल.
अर्जाचे शुल्क
आरक्षित वर्गातील पुरुष उमेदवारांना 50 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागतील. तर इतर मागास वर्ग पुरुष आणि ईडब्लूएस उमेदवारांना 450 रुपये द्यावे लागली. परीक्षेचं शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगच्या माध्यमातूनच होईल.