Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तर प्रदेशात विधान परिषद सचिवालयातील 73 पदांसाठी भरती, या प्रकारे करता येईल अर्ज

उत्तर प्रदेशात विधान परिषद सचिवालयातील 73 पदांसाठी भरती, या प्रकारे करता येईल अर्ज
, शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (16:21 IST)
UP Vidhan Parishad Recruitment 2020 : उत्तर प्रदेश विधान परिषद सचिवालयात विविध पदांवरील 73 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याच्या तयारीत असलेले उमेदवार आपली योग्यता आणि आवडीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबर 2020 पासून सुरू झाले आहे. 

ऑनलाईन अर्ज 16 ऑक्टोबर 2020 पर्यंत सादर केले जाऊ शकतात. भरती अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की या जाहिरातींतर्गत वेग वेगळ्या पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावे लागणार. त्याचबरोबर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क देखील द्यावे लागणार. उमेदवारांना कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण भरतीची अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 
 
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या तारखा -
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 18 सप्टेंबर 2020.
परीक्षेसाठी नोंदणीची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2020
ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख - 13 ऑक्टोबर 2020
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 16 ऑक्टोबर 2020 
 
अर्ज शुल्क - 
1050 रुपये (800 रुपये अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातीसाठी)
 
अर्ज कसा करावा- 
उमेदवार या www.upvpsrecruitment.org संकेत स्थळावर जाऊन भरती मार्गदर्शक सूचना बघू शकता. या सूचना 18 सप्टेंबर 2020 पासून उपलब्ध असतील. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या कॉलम मध्ये आपला मोबाईल नंबर आणि वैध ई मेल आयडी प्रविष्ट करावी लागणार. त्याशिवाय आपली नोंदणी 
 
पूर्ण होणार नाही. उमेदवाराने दिलेल्या मोबाईल नंबरवर सर्व माहिती/सूचना एसएमएस किंवा ई मेल आय डी वर पाठविण्यात येईल.  www.upvpsrecruitment.org या संकेत स्थळावर जाऊन अप्लाय (apply) या लिंक कर क्लिक करावं लागणार. इथे उमेदवाराची नोंदणी बद्दलची माहिती देऊन जमा करावं लागणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने लट्ठपणा वाढतो