Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

UPPCL Recruitment 2021 उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनमध्ये सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू

UPPCL Recruitment 2021 उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनमध्ये सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू
, मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (09:12 IST)
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (UPPCL) ने 286 सहाय्यक अभियंता (AE) आणि कनिष्ठ अभियंता (JE) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदविका आणि पदवी पूर्ण केलेले उमेदवार या विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2021 आहे. विविध पदांसाठी उमेदवारांची निवड भरती परीक्षेच्या आधारे केली जाईल. या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
 
अधिसूचनेनुसार, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) च्या 173 पदांची भरती केली जाईल. तर सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/आयटी) च्या 113 पदांसाठी रिक्त जागा आहेत.
 
भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख - 12 नोव्हेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 2 डिसेंबर 2021
अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख - 2 डिसेंबर 2021
भरती परीक्षेची तारीख – जानेवारी 2022
 
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक आहे. याशिवाय, सहाय्यक अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी (B.Tech/BE) असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, जेईच्या पदांसाठी 18 ते 40 वर्षे आहे. तर सहाय्यक अभियंता पदांसाठी वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
 
अर्ज फी
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क 1180 रुपये आहे. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी अर्जाची फी 826 रुपये आहे. अर्जाची फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे जमा केली जाऊ शकते.
 
याप्रमाणे अर्ज करू शकता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या www.upenergy.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. मुख्यपृष्ठावर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक मिळेल. अधिसूचना वाचल्यानंतर, तुम्ही त्यात दिलेल्या माहितीनुसार अर्ज भरू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कान स्वच्छ करण्यासाठी उपाय, याने ऐकण्याची क्षमताही वाढेल