Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्युटी पार्लर तुमच्याच स्वयंपाकघरात

ब्युटी पार्लर तुमच्याच स्वयंपाकघरात
आपल्या सुंदर नाजूक चेहर्‍याबाबत काही समस्या उद्‍भवल्यास आपण सरळ सौंदर्यतज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी जातो. मात्र, आपण हे विसरतो, की आपल्याच घरातील स्वयंपाक खोलीत सौंदर्यवर्धक वस्तुंचा खजिना आहे. या खोलीत एक नजर फिरवली तर एक ना अनेक बहुगुणी गोष्टी तुमच्या दृष्टीस पडतील. त्या वस्तूंचे लेप तयार करून त्याचा उपयोग फेस पॅक म्हणून करू शकता. 

घरगुती वस्तुंपासून फेस पॅक तयार करण्याच्या पध्दती-

चंदन- चंदन उगाळून त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून तयार केलेला लेप चेहर्‍यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. चेहर्‍याची त्वचा अधिक गुळगुळीत असेल तर चंदनात काही प्रमाणात गंधक मिसळावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा फेस पॅक चेहर्‍यासाठी अधिक गुणकारी असतो.

दही - एक चमचा हरभरा डाळीच्या पीठात दोन चमचे दही, दोन थेंब मध यांचे मिश्रण तयार करून अर्धा तास तसेच राहू द्या. सुरकत्या पडलेल्या चेहर्‍यावर लावल्याने आराम पडतो.

पुदिना - हिरवा पुदिना वाटून साधारण अर्धा तास चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. पुदिन्याचा लेप लावल्याने त्वचेची उष्णता हळू हळू कमी होते व तारूण्यपिटीकांचे डागदेखील कमी होतात.

सोयाबीन किंवा मसूर डाळ :- एक छोटी वाटी सोयाबीन किंवा मसूर डाळ रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्यातील पाणी काढून ते चांगल्या पध्दतीने वाटून घ्या. त्यात थोडे कच्चे दूध व बदाम पावडर टाकून लेप तयार करा व तो चेहर्‍यावर लावल्याने त्वचेमधील कोरडेपणा दूर होतो.

उडीद डाळ- उडीद डाळीची पावडर तयार करून त्यात गुलाब जल, ग्लिसरीन व बदाम पावडर मिसळा व तयार झालेला लेप लावल्याने चेहरा प्रसन्न होतो व सुरकुत्या नाहीशा होतात.

लोणी - पाण्यात थोडे लोणी मिसळून तयार झालेला लेप अर्धा तास चेहर्‍यावर लावून ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. चेहर्‍यावर लोणी लेप लावल्याने त्वचेचा शुष्कपणा नाहीसा होतो.

काकडी - काकडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात थोडे दूध टाकून तयार झालेला लेप चेहरा व मानेवर लावा. काही वेळ तसाच ठेवून धूवून टाका. त्याने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होऊन त्वचा मुलायम होते.

मुलतानी माती - एक छोटा चमचा मुलतानी माती घ्या. त्यात एक छोटा चमचा गुलाब पाणी अथवा क्लीनजिंग मिल्क मिसळून त्याचा लेप चेहर्‍यावर लावा. 10 ते 15 मिनिटानंतर कोमट पाण्याते ते धूवून टाका. त्याने चेहरा तेजस्वी दिसतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुर्वेदानुसार वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी हे करा!