Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अशी सजवा फुलदाणी

अशी सजवा फुलदाणी
NDND
फुले घर आणि जीवनही फुलवतात. घराला फुलांनी सजविणे ही देखिल एक कला आहे. फुलांचे गुच्छ तोडून असेच फुलदाणीत ठेवून दिल्याने त्याचे सौंदर्य वाढत नाही. सुंदर सजविल्यानेच फुलदाणीचे सौदर्यं वाढते. फुलांची सजावट करताना खालील गोष्टी लक्षात घ्या..

* पुष्पसज्जा करताना दीर्घ काळ ताजी राहतील अशीच फुले निवडा. फुले हाताने न तोडता धारदार चाकूने तोडा.
* फुले निवडताना फुलदाणीचा आकार लक्षात घ्या. फुलदाणी लहान असेल तर लहान दांडीची फुले निवडा व मोठी असतील तर मोठ्या दांडीची फुले निवडा. पसरट व मोठ्या आकाराच्या फुलदाणीसाठी पसरट व मोठ्या आकाराची फुले निवडा.
* फिक्या रंगाच्या फुलांसाठी फिक्या रंगाची पाने व गडद रंगाच्या फुलांसाठी गडद रंगाची पाने वापरा.
* एकाच वेळी जास्त रंगाची फुले ठेवण्यापेक्षा दोन-तीन रंगाची फुले ठेवा.
* फुले एकाच दिशेला व पाने एकाच दिशेला येणार नाहीत याकडे लक्ष द्या.
webdunia
NDND
* फुले अधिक काळासाठी ताजी राहण्यासाठी ती काही वेळ थंड जागेत ठेवा.
* फुलदाणीच्या पाण्यात थोडी साखर, मीठ व डेटॉलचे काही थेंब टाका. यामुळे फुले जास्त काळ ताजी राहतात.
* तांब्याच्या फुलदाणीत फुले लवकर कोमेजत नाहीत. तांब्याची फुलदाणी नसेल तर फुलदाणीत तांब्याची नाणी टाका.
* सुगंधी फुलांना 10 मिन‍िटे थंड पाण्यात ठेवून नंतर फुलदाणीत सजवा. यामुळे सुगंध जास्त काळ टिकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi