Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओव्हरवेट स्त्रियांनी या 4 वस्तू घालायला नको

ओव्हरवेट स्त्रियांनी या 4 वस्तू घालायला नको
सर्वांना फॅशनेबल दिसण्याचा हक्क असला तरी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्यावर काय छान दिसतंय आणि काय नाही. हा नियम सगळ्याचं अंगकाठीच्या लोकांसाठी लागू होतो. आम्हाला तेच कपडे घालायला हवे जे आपल्या बॉडीवर सूट होत असतील. अशाने आपण प्लस साइज असल्यावरही फॅशनेबल दिसू शकता. खरंच! योग्य निवड करून आपण आपले बेस्ट फीचर्स हायलाइट करू शकता. म्हणूनच येथे आम्ही शेअर करत आहोत अश्या 4 वस्तू ज्यापासून ओव्हरवेट स्त्रियांनी दूर राहायला हवं.

टाइट कपडे: टाइट फिटिंग आणि बॉडी हगिंग असलेले आऊटफिट्स नको ते बॉडी पार्ट्स हायलाइट करतात. म्हणून हे घालणे टाळा. आपल्या वार्डरोबमध्ये सैल नेक टॉप, लॉग कुर्ते, कफ्टान, पोचू आणि उभ्या रेषा असलेले पॅटर्न असले पाहिजे. प्लेन पेक्षा प्रिंटेड कपडे आपला स्थूलपणा लपवतील. ब्रॉड प्रिंट्ससोबत श्रग घालणे ही योग्य राहील. 

 

लूज अंडरगार्मेंट्स: फिटिंगचे आणि ब्रँडेड अंडरगार्मेंट्सची काय गरज? आपला हा विचार चुकीचा आहे. ब्रँडेड आणि योग्य साइजची ब्रा घातल्याने बाहेरच्या कपड्याची फिटिंगपण पर्फेक्ट दिसते. आवश्यक वाटल्यास मिनिमाइज़रपण घालू शकता. आपले बट शेपमध्ये दिसावे यासाठी बॉक्सर किंवा हाय राइझ पेंटीज वापराव्या.

webdunia

स्लीवलेस: स्लीवलेस आणि स्ट्रैपलेस ड्रेसेज घालणे टाळा. यात आपण अधिक लठ्ठ दिसाल. हाफ किंवा थ्री-फोर्थ आपल्यासाठी योग्य विकल्प ठरेल.

webdunia

होजियरी: कापड निवडताना शक्यतो होजियरी किंवा मिक्स कॉटनसारखं कापड टाळलेलं बरं. क्रेप किंवा कर्डरॉयसारखं कापड घेऊ शकता. जॉर्जेट आणि शिफॉन कापडदेखील योग्य राहील.

webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi