Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय तुम्ही हेअरकट करत आहे?

काय तुम्ही हेअरकट करत आहे?

वेबदुनिया

, मंगळवार, 5 एप्रिल 2011 (18:14 IST)
WD
जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व खुलवायचे असेल तर आपल्या चेहर्‍याचा आकार लक्षात घेऊन त्याप्रमाणे हेअरकट करायला हवा. चेहर्‍याला शोभून न दिसणारा हेअरकट केला तर व्यक्तिमत्त्व उठावदार दिसत आही. जर चेहरा बदामाच्या आकाराचा असेल तर टोकदार हनुवटी झाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी डोळे आणि गालांची ठेवणही लक्षात घ्यावी लागते. अशा प्रकारचा चेहरा असलेल्या तरुणींनी मानेपर्यंत लांब केस ठेवून काही बटा कपाळावरून पुढे काढाव्यात. बदामी चेहर्‍याच्या तरुणींनी ब्लंट करणे टाळावे.

चेहरा आयताकृती असेल तर कर्ली किंवा चॉपी कट उठून दिसेल. केसांसाठी स्किपी कय तर मोठ्या केसांसाठी लेअर कट केला तर चेहर्‍याचे सौंदर्य खुलून दिसेल.

गोल चेहर्‍याला अंडाकृती रूप देण्यासाठी चेहर्‍याच्या आजूबाजूला कमीत कमी कसे असावेत. केस लहान असतील तर ते कुरळे करून घेण्याची चुक करू नये. कारण, कुरळ्या केसांमुळे चेहरा आणखीनच गोल दिसतो.

चेहरा उभय असेल तर हनुवटीपर्यंत लांबी असेला बॉबकट खुलून दिसतो. कुरळे केस अशाचेहर्‍याच्या तरुणींना शोभून दिसतात. पण जर केस लांब असतील तर त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi