Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेहनती व्हा, पण वर्कोहोलिक नको!

मेहनती व्हा, पण वर्कोहोलिक नको!
तुमच्याबाबतीत कधी असं झालं आहे का, ऑफिसातील सर्व लोक काम करून आपापल्या घरी चालले गेले आणि तुम्ही त्यानंतर बराच वेळ ऑफिसमध्ये काम करीत बसले आहात? किंवा कधी असं झाले आहे का तुम्ही तुमच्या कुटुंबियासोबत सहलीला गेले आहात, पण तुमच्यासोबत ऑफिसच्या फायलीसुद्धा आहेत? किंवा तुमच्या जवळ नातेवाइकांना भेटायलासुद्धा वेळ नाही?

वर दिलेल्यापैकी एक गोष्टसुद्धा तुम्हाला लागू होत असेल तर तुम्ही 'वर्कोहॉलिक' आहात, म्हणजे कामाने तुम्हाला कह्यात घेतले आहे. मानसोपचार तज्ज्ञांनुसार पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त वर्कोहोलिक असतात.

आता मल्टिनॅशनल कंपन्या सगळीकडे पसरलेल्या आहेत. प्रत्येकावर कामाचा भार पडलेला आहे. प्रायव्हेट कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा देत नाही, म्हणून लोक थोड्या वेळात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तांत्रिक उपकरणे उदा. इंटरनेट, सेलफोन, लॅपटॉप हे सर्व आमच्या जीवनाचे अभिन्न अंग बनत चालले आहेत. आम्ही कुठेही गेलो तरी ही सर्व साधने आमच्या बरोबरच असतात.

मेहनती व वर्कोहोलिक असण्यात फरक असतो. मेहनती लोक कामे वेळेत पूर्ण करतात. वर्कोहोलिक लोक कुठल्याही कामाला पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ घेतात. मेहनती लोक आपले कुठलेही काम चातुर्याने पूर्ण करून स्वत:साठी वेळ नक्कीच काढून घेतात, पण वर्कोहोलिक लोक कामात इतके गुंतून जातात की त्यांना स्वत: व कुटुंबियांसाठी बिलकुल वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना आपली हौस व इच्छा बाजूला ठेवावी लागते. आपले आरोग्य व स्वत:च्या खासगी जीवनाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नसतो. हे लोकं एकाच वेळी बरेच काम आपल्या हाती घेऊन सर्व कामांना पूर्ण करण्याकडे लागलेले असतात. पण त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स घसरतो. सहाजिकच त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते.

म्हणूनच मेहनती बना पण वर्कोहोलिक नका. कामात व्यस्त असाल तर दिनचर्या अशी बनवा की काही वेळ कुटुंबाला नक्कीच देता आला पाहिजे. स्वत:साठी वेळ काढा, व्यायाम करा, सुटी घेऊन फिरायला जा.

Share this Story:

Follow Webdunia marathi