Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नानंतर ऑफिसमध्ये जाताना..

लग्नानंतर ऑफिसमध्ये जाताना..
नवीन-नवीन लग्न झालंय. हिरवा चुडा, भरजरी साड्या किंवा सूट, मोठं मंगळसूत्र, मोठी टिकली किंवा गजरा लावणं आवडतं असलं किंवा गरजेचं असलं तरी वर्किंग वूमन म्हणून ऑफिसमध्ये जाताना थोडं ऑकवर्ड वाटणं साहजिक आहे. म्हणून या टिप्स अमलात आणा:

* थोडं क्रिएटिव बना आणि चमक धमक असलेल्या पंजाबी सूटचा कुर्ता साध्या लेगिंग आणि दुपट्याबरोबर घाला. याने तीन ड्रेस तयार होतील आणि तुम्ही छम्मक छल्लो बनून ऑफिसला जाताय असेही नाही वाटणार. हो पण नवीन लग्न झालाय म्हणून ब्राइट कलर घालण्यात हरकत नाही.

* हेवी मेकअप करून ऑफिसला जाऊ नये. गुलाबी किंवा बदामी रंगाची लिपस्टिक, स्टिकने सिंदूर आणि काळ्या रंगाचं काजळ लावावं. एखाद्या दिवशी अगदी साधा सूट असल्यास निळा किंवा ग्रे रंगाचं काजळही वापरू शकता.

* या सगळ्यावर ब्रेसलेट स्टाइलची घडी शोभून दिसेल. मग ती सिल्वर, गोल्डन किंवा इतर कोणत्याही ब्राइट कलरची असली तरी हरकत नाही.

* लहान मंगळसूत्राबरोबर एखाद साधी ज्वेलरी घालून जाऊ शकता. बांगड्यांनी पूर्ण हात भरलेलाच असला पाहिजे असे नाही. शगुनाची बांगडी आणि लहानसे कानातलेही शोभून दिसतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रपोज करण्याचे 7 प्रकार, ती नक्की म्हणेल हो