Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वेलवेट : एक बोल्ड फॅब्रिक

वेलवेट : एक बोल्ड फॅब्रिक

वेबदुनिया

WD
सध्या काही जुन्या फॅशन नव्यानं परत येऊ लागल्या आहेत. वेलवेट ही त्यातलीच एक आकर्षक फॅशन. वेलवेटचा ड्रेस किंवा वेलवेटची पँट असं साधं डोळ्यासमोर आणलं, तरी ही फॅशन काहींना नकोशी वाटते. साहजिकच आहे, कारण वेलवेट बोल्ड फॅब्रिक म्हणूनच ओळखलं जातं. ते बेतानं घातलं, तरच उठून दिसतं. अन्यथा झँकीपँकी असा ठपका लागायला वेळ लागत नाही. म्हणूनच तर वेलवेटची फॅशन कॅरी करायला धाडस लागतं.

वेलवटचा कपडा परिधान केल्यास श्रीमंती लूक येतो. तो घालताना काही गोष्टी काळजीपर्वूक टाळल्या पाहिजेत आणि पाळल्याही पाहिजेत.

गळ्यापासून पायापर्यंत वेलवेट फॅब्रिक वापरून ड्रेस शिवू नये. एकावेळी वेलवेटचा एकच प्रकार अंगारव ठेवा. आधी म्हटल्याप्रमाणे हे बोल्ड फॅब्रिक असल्यानं संपूर्ण शरीरभर ते चांगल दिसत नाही. पाहाणारा एकदम दोन पावलं मागे जाण्याची शक्यता असते! चुडीदार शिवताना बाह्या आणि ओढणीच्या किनारीलाच वेलवेटची लेस लावा किंवा डिझाइन करा. कुडत्याच्या शेवटलाही वेलवेटचा पॅच लावता येईल.



webdunia
WD


वेस्टर्न वन पीस घालणार असाल, तर गुडघ्यापर्यंतच त्यांची उंची ठेवा. पोटरीपर्यंत मिडी नकोच. हा पॅटर्न स्लिव्हलेस ठेवा. पूर्ण बाह्या नकोतच, मिडी वेलवेटचा आणि गळा तसंच बाह्या नेटच्या शिवण्याचीही फॅशन आहे.

ज्यांना एकदम वेलवेट घालण्याचं धाडत होत नसेल, त्यांनी आधी वेलवेटच्या अ‍ॅक्सेसरीज घालून पाहा. उदा. हेअरबँड, हँडपर्स, शूज, बेल्ट इत्यादी.


webdunia
WD
वेलवेटची स्ट्रेट फिटिंग पँटही उत्तम पर्याय आहे. मात्र, त्या घालताना आपला वर्ण त्याला जुळतोय ना हे नक्की पाहा. साधारणत: गोर्‍या, सावळ्या रंगाच्या व्यक्तींना वेलवेटच्या पँट चांगल्या दिसतात. वेलवेटची पँट घातल्यानंतर त्यावर फ्लॉवर प्रिंट असेला शर्ट घालता येईल. तो शक्यतो इनच करावा.

वेलवेटच्या पँटमध्ये रंगांचे पर्याय तसे कमी असतात. उदा. वांगी, काळा, बरगंडी, जांभळा इत्यादी. महत्त्वाच म्हणजे, पँट निवडताना असेत गडद रंग घ्या. त्यावर फिक्या रंगाचा कोणताही टॉप उठून दिसतो.

जीन्स आणि टॉपवर वेलवेटचं पूर्ण बाह्यांचं जॅकेट उत्तम पर्याय आहे. कॉलेज पार्टी, आउटिंग तसंच ऑफिसमध्येही हे कॉम्बो चांगलं दिसतं.

webdunia
WD
वेलवेटच्या ड्रेसवर दागिने कोणते घालावेत हा तसा गोंधळात टाकणार प्रश्न आहे. एक इथं लक्षात ठेवा, मुळात वेलवेट हे चमकणारं फॅब्रिक असल्यानं दागिनेही चमचमणारे नकोत. मोती, स्टोन, हिर्‍याचे दागिने वेलवेटच्या ड्रेसवर नकोतच. मेटलच्या एक्सेसरीज ट्राय करून पाहा. मेटलची लांब चेन वनपीसवर चांगली जाईल. मेकअपही साधा ठेवा.

हिवाळा आणि पावसाळ्यात वेलवेटचे कपडे बाहेर काढा. एकतर त्यानं उबही मिळते आणि त्याच रंग-मटेरियल डोळ्यांना छान वाटतात.

साडीमध्येही वेलवेट वापरता येतं. वेलवेटचा गडद रंगांचा ब्लाउज आणि त्याच रंगछटेतील साडी हे कॉम्बो करून पाहा. नेटची साडी आणि वेलवेटचा ब्लाउज हॉट पर्याय आहे. अन्यथा, साडीला किनार म्हणून वेलवेटची लेस लावता येईल. काही सेलेब तर नेटची साडी ‍आणि त्याचा संपूर्ण पदर वेलवेटचा अशी फॅशन कॅरी करतात.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi